Header AD

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या कर्मचा-यांना 7 वा वेतन आयोग आता ख-या अर्थाने लागू !

कल्याण , प्रतिनिधी  :  राज्य शासनाने 1 जानेवारी 2016 पासून 7 वा वेतन आयोग लागू केला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मा. सर्वसाधारण सभेने देखील याबाबतचा ठराव पारित केल्यानंतर प्रशासनाने दि.04/12/2020 रोजीच्या पत्रान्वये शासनाकडे सदर प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविला आणि शासनाने दि.29/12/2020 रोजी सदर प्रस्तावास मंजूरी देऊन कर्मचा-यांना दि.01/01/2016 पासून 7 वा वेतन आयोग लागू करणेबाबत तसेच माहे जानेवारी 2021 पासून प्रत्यक्ष वेतनात देणेबाबत कळविले आहे.


त्याअनुषंगाने विद्यमान पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कर्मचा-यांच्या तसेच कर्मचारी संघटनेच्या मागण्यांचा सहानूभूतीपूर्वक विचार करुन 7 वा वेतन आयोग महापालिकेच्या आस्थापनेवरील सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच शिक्षण व परिवहन विभागाच्या आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी यांना लागू  करून मकर संक्रातीच्या दिवशी गोड बातमी दिल्यामुळे  सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे.


7 वा वेतन आयोग महापालिका अधिकारी/कर्मचा-यांना माहे जानेवारी 2021 च्या फरकासह माहे फेब्रुवारीच्या वेतनात लागू करण्यात येणार असून दि. 01/01/2016 ते 31/12/2020 या कालावधीतील फरकाची रक्कम पुढील 5 वर्षात 5 समान हप्त्यात कार्यरत कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्यात येणार असून सेवानिवृत्त कर्मचा-यांना 3 वर्षात 3 समान हप्त्यात रोखीने अदा करण्यात येणार आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या कर्मचा-यांना 7 वा वेतन आयोग आता ख-या अर्थाने लागू ! कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या कर्मचा-यांना 7 वा वेतन आयोग आता ख-या अर्थाने लागू ! Reviewed by News1 Marathi on January 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads