Header AD

प्रभाग क्रमांक 25 येथील क्षेत्रातील शासनाच्या व वन क्षेत्राच्या घराना सेवा शुल्क लागू

कळवा, अशोक घाग  :  महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेवक मिलिंद पाटील मा मनाली पाटील यांच्या आशीर्वादाने व कळवा प्रभाग समिती अध्यक्ष सौ वर्षा मोरे सर्व नगरसेवकांच्या प्रयत्नाने तसेच ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील शासनाच्या व वन विभाग इतर प्रतिबंधित क्षेत्रावर असणाऱ्या मिळकतधारकांना सर्व नागरिकांच्या घराना सेवा शुल्काची आकारणी करण्याचे शिबिराचे आयोजन प्रभाग क्रमांक 25 येथे आज शुभारंभ करण्यात आला.


त्याप्रसंगी कळवा प्रभाग समिती अध्यक्ष स्थानिक नगरसेविका वर्षा मोरे नगरसेवक महेश साळवी ठाणे शहर उपाध्यक्ष अरविंद मोरे ठाणे महानगरपालिका चे सेवा शुल्क अधिकारी सोपान भाईक. उपकर निरीक्षक अनिल पाटील दिलीप विखरण कर रमेश कुऱ्हाडे संदीप महाले जगदीश गौरी भालचंद्र पाटील नामदेव कोठारी सुरज देशमुख चंदनशिवे अमरसिंग मान्यवर उपस्थित होते गेले अनेक वर्ष या भागातील घरांना सेवा शुल्क आकारणी झाली नव्हती पण ठाणे महानगरपालिकेच्या वतीने या चांगल्या उपक्रमामुळे येथील नागरिकांनी ठाणे महानगरपालिकेचे आभार मानले आहेत तसेच येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे असे प्रतिपादन स्थानिक नगरसेविका वर्षा मोरे यांनी सांगितले
प्रभाग क्रमांक 25 येथील क्षेत्रातील शासनाच्या व वन क्षेत्राच्या घराना सेवा शुल्क लागू प्रभाग क्रमांक 25 येथील क्षेत्रातील शासनाच्या व वन क्षेत्राच्या घराना सेवा शुल्क लागू Reviewed by News1 Marathi on January 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads