Header AD

साक्षी भोईटे यांचा एज्युकेशन अवॉर्ड 2020 ने सन्मान

 मुंबई , प्रतिनिधि : शिक्षक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी आणि मुलांना करिअर घडविण्यासाठी समर्पित सेवा देणाऱ्या रायन इंटरनॅशनल ग्रुप मधील शिक्षिका साक्षी आशिष भोईटे यांना एज्युकेशन आयकॉन 2020 या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.


शिक्षण क्षेत्रातील बदलांचा विचार करून त्या नुरूप अध्यापन करणाऱ्या कल्पक शिक्षकांचा शोध घेणाऱ्या एज्युकेशन आयकॉन अवार्ड या संस्थेने साक्षी भोईटे यांना  राष्ट्रीय स्तरावरील हा  पुरस्कार ऑनलाईन सोहोळ्यात प्रदान करण्यात आला. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रो. डॉ. एच. के. सरदाना, मोटिव्हेशनल स्पीकर दिलबग सिंग, जयश्री किदाम्बी, प्रितिका शर्मा आदी उपस्थित होते. यावेळी वक्त्यांनी साक्षी यांच्या योगदानाचा अत्यन्त गौरव पूर्ण उल्लेख केला. 


रायन इंटरनॅशनल स्कुल मध्ये 2005 पासून अध्यापन करणाऱ्या साक्षी या मुलांच्या अडचणींचे आकलन करून त्यांच्या कलेने विषय शिकवतात. शिवाय मुलांच्या खांद्यावरील आणि मनावरील ओझं कमी करून तणाव मुक्त शिक्षण देण्यासाठी त्या पालकांचे आणि मुलांचेही उचित समुपदेशन करून त्यांच्या अडचणी दूर करतात. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या नॅशनल चिल्डरन सायन्स कॉन्फरन्सशी त्या संबंधित असून त्या माध्यमातून बाल व युवा वैज्ञानिक घडविण्यासाठी त्या मार्गदर्शन करतात.


रायन इंटरनॅशनल ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती डॉ ग्रेस पिंटो आणि अध्यक्ष डॉ अगस्टाईन फ्रान्सिस पिंटो यांनी संस्थेसाठी शिकवणूक ही खरी आपल्या कार्याची प्रेरणा असल्याचे साक्षी भोईटे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं. मुलांवर शिक्षण रुपी संस्कार करणे ही ईश्वराने शिक्षकांवर दिलेली जबाबदारी आहे आणि त्याच भावनेतून आपण कार्य करीत असल्याचेही साक्षी यांनी सांगितले. आपल्या पुरस्काराचे श्रेय त्यांनी पती, सासू आणि आई वडिलांना देतानाच त्यांच्या मूळेच आपण शिक्षण क्षेत्रात काम करू शकलो असही साक्षी यांनी नमूद केले.

साक्षी भोईटे यांचा एज्युकेशन अवॉर्ड 2020 ने सन्मान साक्षी भोईटे यांचा एज्युकेशन अवॉर्ड 2020 ने सन्मान Reviewed by News1 Marathi on January 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads