Header AD

मराठा सेवा संघाने केला 15 जणींना ‘जिजाऊ’ पुरस्काराने सन्मान
ठाणे , प्रतिनिधी  :  मराठा सेवा संघाच्या वतीने राष्ट्र माता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या 15 महिलांचा जिजाऊ पुरस्काराने सन्मान केला.मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष मंगेश आवळे यांनी जिजाऊ जयंतीनिमित्त ठाण्यातील कोपरी येथे जिजाऊ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 


या महोत्सवामध्ये कोपरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसूझा, गतिमंद मुलांची काळजी घेणार्‍या मिना क्षिरसागर, साहित्यिक व पत्रकार नंदीनी सोनावणे, कवयित्री प्रा.  भाग्यश्री कुडूक, जलपरी सई पाटील, कराटेपटू दिपाली सुर्वे, पारिचारिका शर्मिला पठारे, डॉ. तेजस्विनी भगत, कंडक्टर आनंदी भोसले, पोलीस खेळाडू कृतिका महाडिक, वास्तू विशारद श्रावस्ती नलावडे, वकील माधुरी गायकवाड, विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, वीरबाला श्रद्धा गोवळकर, वीरपत्नी ज्योती राणे यांचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ऋता आव्हाड, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या हस्ते “जिजाऊ पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.


दरम्यान, यावेळी शिवव्याख्याते संदीप जाधव यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी, महिलांनी कर्मकांडात अडकवण्याऐवजी जिजाऊ, सावित्री माई, फातिमा शेख यांच्या चरित्राचे पारायण करावे, असे आवाहन केले.

मराठा सेवा संघाने केला 15 जणींना ‘जिजाऊ’ पुरस्काराने सन्मान मराठा सेवा संघाने केला 15 जणींना ‘जिजाऊ’ पुरस्काराने सन्मान Reviewed by News1 Marathi on January 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कचरा फेकणाऱ्यांनी पालिकेच्या भरारी पथकाला केली मारहाण दोघांना अटकेत

डोंबिवली ,  शंकर जाधव   :  कल्याण डोंबिवली महापालिकेचा स्वच्छ शहरात वरचा क्रमांक यावा तसेच शहर स्वच्छ राहावे यासाठी पालिकेने रात्रीचा कचरा ...

Post AD

home ads