Header AD

"अ" प्रभागक्षेत्रातील अनाधिकृत बांधकामावर मनपाची धडक कारवाईवअनाधिकृत बांधकामे केली भुईसपाट




कल्याण , कुणाल  म्हात्रे  : "अ" प्रभाग क्षेत्रातील आंबिवली,  अटाळीमोहनेटिटवाळा परिसरातील अनाधिकृत रूम, अनाधिकृत दुकानाचे गाळेअनाधिकृत जोतेअनाधिकृत  तळमजला +२ माळे असलेले आरसीसी बांधकाम,  अनाधिकृत पत्र्याचे शेडचिकण मटनच्या टपऱ्यांवर "अ" प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने धडक कारवाईचा बडगा उचलित हातोडा चालवित भुईसपाट केली.


 "अ" प्रभागातील टिटवाळ्यातील वाडी परिसरातील ३ अनाधिकृत रूम तसेच ६ अनाधिकृत दुकाने टिटवाळा मंदिर रोड येथील चिकन मटण विक्रीच्या ७ अनाधिकृत टपऱ्या आंबिवली येथील अनाधिकृत पत्र्याचे शेड, अटाळी येथील अनाधिकृत स्लाँप् बांधकाम, अटाळी येथील पाण्याच्या टाकीजवळ ५ अनाधिकृत जोते, अटाळीतील ७ अनाधिकृत रुम मोहने येथे तळमजला + २ माळे असलेली आरसीसी अनाधिकृत  बांधकामावर प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने कारवाईचा बडगा उचलित अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली.


या कारवाईसाठी १ जे.सी.बी., अनाधिकृत बांधकाम विभागचे ४ पोलीस कर्मचारी तसेच  अनधिकृत बांधकाम पथकाचे १० कर्मचारी, असा फौज फाटा होता. "अ" प्रभागक्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने केलेल्या अनाधिकृत बांधकामावरील कारवाई मुळे  अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांचे या कारवाईने धाबे दणाणले आहे.


आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उप आयुक्त सुधाकर जगताप   यांच्या निर्देशानुसार कारवाईचा बडगा सुरु राहणार असुन अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यावर एमआरटीपी अँक्टनुसार गुन्हे दाखल करीत कारवाई सुरू असणार असल्याचे प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांनी सांगितले.

"अ" प्रभागक्षेत्रातील अनाधिकृत बांधकामावर मनपाची धडक कारवाईवअनाधिकृत बांधकामे केली भुईसपाट "अ" प्रभागक्षेत्रातील अनाधिकृत बांधकामावर मनपाची धडक कारवाईवअनाधिकृत बांधकामे केली भुईसपाट Reviewed by News1 Marathi on December 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या ध्येयपूर्ती पुस्तकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   दिलीप  गुंड यांचे "ध्येयपूर्ती" हे पुस्तक ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला आशादायी व प्रेरणादायी असे...

Post AD

home ads