Header AD

वकील संघटनेने केला गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा सत्कार

 



ठाणे , प्रतिनिधी  : राज्यात गृहनिर्माण खात्याला स्वतंत्र ओळख मिळवून दिल्याबद्दल तसेच कोरोना काळात स्वत:च्या प्रकृतीची काळजी न घेता जनसेवेसाठी स्वत:ला वाहून दिल्याबद्दल डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा ठाणे बार असोसिएशनच्या वतीने सत्कार केला. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक अशरफ (शानू) पठाण आणि परिवहन सदस्य शमीम खान हे उपस्थित होते.


डॉ. जितेंद्र आव्हाड यांची महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. आपल्या मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अत्यंत वेगवान पद्धतीने कामे करुन चांगले निर्णय घेतले आहेत. तसेच, कोरोना काळात स्वत: रस्त्यावर उतरुन त्यांनी जनतेला अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. त्यातून त्यांनाही कोरोनाची लागण झाली. एवढ्या प्रचंड प्रमाणात जनसेवेला वाहून घेतल्याबद्दल ठाणे वकिल संघटना अर्थात बार असोसोशिएशनच्या वतीने डॉ. आव्हाड यांचा बार असोशिएशनमध्ये जंगी सत्कार करण्यात आला.

वकील संघटनेने केला गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा सत्कार वकील संघटनेने केला गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा सत्कार Reviewed by News1 Marathi on December 21, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads