Header AD

नव्या कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी रस्त्यावर

 



 
भिवंडी ,  प्रतिनिधी  : केंद्र सरकारने नुकताच मंजूर केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात   दिल्लीत गेल्या १० दिवसांपासून देशभरातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या शेतकरी आंदोलना पाठींबा व  नव्याने लागू झालेला  कृषी कायदा  रद्द करण्याच्या मागणीसाठी आज राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्त्यांनी  रस्त्यावर उतरून केंद सरकार विरोधात भिवंडीत मोर्चा काढला होता. 


नवा कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीचे दिले निवेदन...

भिवंडी राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष भगवान टावरे यांच्या नेतृत्वाखाली आज भिवंडी शहरातील प्रमुख रस्त्यावर शेकडो कार्यकर्ते एकत्र येत, त्यांनी  केंद्र सरकारने नुकताच मंजूर केलेल्या नव्या कृषी कायद्याला विरोध करीत हा कायदा शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा असल्याने रद्द करण्याची यावेळी मागणी करण्यात आली आहे. हा मोर्चा दुपारच्या सुमाराला प्रांत अधिकारी कार्यलयावर धडकताच मोदी सरकार विरोधात जोरदार  नारेबाजी करण्यात आली . त्यांनतर   प्रांत अधिकारी मोहन नळदकर यांना केंद्र सरकारचा नवा कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
नव्या कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी रस्त्यावर नव्या कृषी कायदा  रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी रस्त्यावर Reviewed by News1 Marathi on December 05, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद प्रकाश आंबेडकर

◆ किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, मुंबईत मात्र हजारो कार्यकर्त्यांची धरपकड, आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे दाखवून दिले....

Post AD

home ads