कच्छ युवक संघात रक्तदान शिबिरात २१५ रक्तदात्यांनी रक्तदान
डोंबिवली , शंकर जाधव : कच्छ युवक संघ डोंबिवली शाखेच्या माध्यमातून श्री डोंबिवली मित्र मंडळ शिक्षा संस्थान यांच्या सहयोगातून तसेच एंकरवाला रक्तदान अभियान अंतर्गत पूर्वेकडील के.बी. वीरा हायस्कूल येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले.यावेळी संयोजक राजेश लालजी मारू, सह-संयोजिका चारूल जतीन मारू, सहयोगी दाता मातुश्री जवेरबेन खुशालचंद गंगर (दुर्गापूर-नववास, कच्छ), प्रमुख पाहुणे अखिल कच्छी राजगोर महासभा प्रमुख भरत छेडा उपस्थित रक्तदान शिबीर संपन्न झाले त्यावेळी आमदार रवींद्र चव्हाण बोलत होते. यावेळी नगरसेवक विश्वजीत पवार, नंदकुमार जोशी, नंदकुमार परब,सायली विचारे, मिहीर देसाई, मितेश पेंडकर, संजय विचारे, अनिल ठाकर,समीर कांबळे,वर्षा परमार आदी उपस्थित होते.
यावेळी शिबिरात सुमारे २१५ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर प्रिन्स अन्नदान जागृती अभियानसाठी सुमारे ४० दात्यांनी घोषणा केली. रक्तदान शिबिरासाठी चिदानंद ब्लड बँक आणि प्लाझ्मा ब्लड बँकचे सहकार्यमिळाले.राजेश लालजी मारू, चारूल जतीन मारू, पंकच चापसी, सचिन माणिकलाल, सालवा आमिष नानजी केनिया, चीमनाभाई गोसार तसेच कच्छ युवक संघ डोंबिवली टीम यांनी रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. कच्छ युवक संघ डोंबिवली तर्फे २० आणि २७ सेंबर रोजी दोन रक्तदान शिबिरे होणार असल्याचे जाहीर केले.

Post a Comment