Header AD

ठाण्यात सर्वत्र शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने
ठाणे , प्रतिनिधी : दिल्ली येथील शेतकर्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार शेतकरी आदोलनांना महाराष्ट्रात विविध ठीकाणी वेगवेगळ्या मार्गांनी समर्थन व्यक्त करित आंदोलन करण्यात आले.ठाण्यातही ठाणे शहर (जि.) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते ठाण्यातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध भागात निदर्शने करीत शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यात आले,ठाण्यातील वागळे इस्टेट येथील आय्.टी.आय्.सर्कल जवळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ब्लाॅकअध्यक्ष विनय विचारे,डाॅ.अभिजीत पांचाळ यांनी शेतकरी समर्थनार्थ निदर्शने केली तर वर्तकनगर येथे ब्लाॅकअध्यक्ष आनंद सागळे,श्रीकांत गाडीलकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले,मुम्ब्रा येथेही मुब्रा प्रभाग समिती अध्यक्षा सौ.दिपाली मोतीराम भगत याच्या मार्गदर्शनाखाली ब्लाॅकअध्यक्ष निलेश पाटील,युवक काँग्रेसचे वसीम हजरथ  यांनी निदर्शने केली तर कळवा येथेही ब्लाॅकअध्यक्ष राजू शेट्टी व रविंद्र कोळी आदि पदाधिका-यांनी शेतकरी आंदोलन प्रती निदर्शने केली तर लोकमान्य नगर येथे ब्लाॅकअध्यक्ष राजू हैबती व हिन्दुराव गळवे यांच्या सह कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. ठाण्यातील शहर मध्यवर्ती काँग्रेस कार्यालय बाहेर ब्लाॅकअध्यक्ष संदिप शिंदे,नरेंद्र कदम व निलेश आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.सेवादल काँग्रेस, महिला काँग्रेस,युवक काँग्रेस सह शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र ऐउन केंद्रातील भा.ज.पा.सरकारच्या विरोधात निदर्शने केली. या प्रसंगी बोलताना शहर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन शिंदे यांनी सांगितले की जवळ जवळ 10 लाख शेतकरी आज दिल्लीतील आंदोलनात सहभागी होत असताना केंद्रातील भाजपा सरकार यांची दखल घेत नसून देशातील काँग्रेस पक्ष हा यापूर्वीही शेतकरीवर्गा सोबत आहे या पूढेही राहील असे सांगितले. 
ठाण्यात सर्वत्र शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने ठाण्यात सर्वत्र शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने Reviewed by News1 Marathi on December 03, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads