Header AD

नगरसेवक सुनेश जोशी यांच्या एस-कनेक्ट या बहुपयोगी अँपचे लोकार्पण
ठाणे लोकसभा प्रभारी आमदार आशिष शेलार यांनी केले अँपचे लॉंचिंग..

प्रभागातील समस्या मांडण्यासाठी ई-व्यासपीठ..


सुनेश जोशी यांनी प्रशांत नगर, विष्णू नगर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या विश्रांतीसाठी निर्मिलेल्या कट्ट्यांचे उदघाटन ...


ठाणे, प्रतिनिधी  :  भारतीय जनता पक्षाचे नौपाडा येथील प्रभाग क्रमांक एकवीसचे नगरसेवक, नौपाडा मंडलाचे अध्यक्ष सुनेश जोशी यांच्या एस-कनेक्ट  या अँपचे आज लोकार्पण करण्या त आले. भारतरत्न, माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपा आमदार आणि ठाणे लोकसभा प्रभारी ऍड. आशिष शेलार यांच्या हस्ते एस-कनेक्ट अँपचे उदघाटन करण्यात आले. यावेळी आमदार संजय केळकर आणि ठाणे शहर जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते.


तंत्रज्ञानाचा वापर करून मतदारांशी नियमितपणे संपर्कात राहून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सक्रिय रहाण्याचा सुनेश जोशी यांच्या पुढाकाराचे आमदार आशिष शेलार यांनी कौतुक केले. ठामपा हद्दीतील लोकप्रतिनिधीने केलेले अश्या प्रकारचे हे पहिलेच अँप आहे असे सुनेश जोशी यांनी म्हटले आहे. एस-कनेक्ट अँप बहुउपयोगी असून प्रभागातील समस्या मांडण्याचे एस-कनेक्ट हे ई-व्यासपीठ आहे. या अँपमधून जनहिताच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे काम सुलभ आणि गतिमान होईल, असे सुनेश जोशी यांनी सांगितले. प्ले-स्टोर्सवरून विनामूल्य एस-कनेक्ट अँप डाउनलोड करून त्याचा वापर करावा, असे आवाहन नगरसेवक सुनेश जोशी यांनी केले आहे.


अँपवर प्रभाग क्रमांक एकवीस मधील नागरिकांना प्रभागातील आपत्कालीन क्रमांक उपलब्ध आहेत. तसेच परिसरातील प्लंबर, वाहन चालक, पेंटर आदि सेवा देणाऱ्यांची माहिती दिली आहे. अँपच्या लोकार्पणानंतर अन्य एका कार्यक्रमात आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते आणि आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत नगरसेवक सुनेश जोशी व मृणाल पेंडसे यांच्या नगरसेवक निधीतून उभारण्यात आलेल्या नौपाड्यातील प्रशांत नगर, विष्णू नगर येथील विश्रांती कट्ट्यांचे उदघाटन करण्यात आले. स्थानिक परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या सोईसाठी हे कट्टे उभारल्याची सुनेश जोशी यांनी सांगितले.

नगरसेवक सुनेश जोशी यांच्या एस-कनेक्ट या बहुपयोगी अँपचे लोकार्पण नगरसेवक सुनेश जोशी यांच्या एस-कनेक्ट या बहुपयोगी अँपचे लोकार्पण Reviewed by News1 Marathi on December 25, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads