Header AD

भिवंडी महानगर पालिकेच्या सभागृह नेतेपदी श्यामजी अग्रवाल यांची निवड




भिवंडी , प्रतिनिधी  :  भिवंडी महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक श्यामजी अग्रवाल यांची नियुक्ती झाल्याचे महापौर प्रतिभा पाटील यांनी आज झालेल्या महासभेत जाहीर केले आहे. यापूर्वी अग्रवाल विरोधी पक्षनेते म्हणून देखील काम केले आहे आजच्या महासभेत महापौर प्रतिभा पाटील महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी श्यामजी अग्रवाल यांची सभागृह नेतेपदी घोषणा करून त्यांचे अभिनंदन केले आहेत.


यापूर्वी सभागृह नेते म्हणून विलास आर.पाटील हे कार्यरत होते.विलास पाटील यांचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी  श्यामजी अग्रवाल यांची नियुक्ती केल्याचे महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी आज झालेल्या महासभेत जाहीर केले.महापौर प्रतिभा पाटील, उपमहापौर इम्रान वली मोह.खान, स्थ्यायी समिती सभापती हलीम अन्सारी, विरोधी पक्ष नेते यशवंत टावरे, सर्व पक्षीय  गटनेते, सर्व उपस्थित सदस्य  यांनी शामजी अग्रवाल यांचे अभिनंदन केले.

भिवंडी महानगर पालिकेच्या सभागृह नेतेपदी श्यामजी अग्रवाल यांची निवड भिवंडी महानगर पालिकेच्या सभागृह नेतेपदी श्यामजी अग्रवाल यांची निवड Reviewed by News1 Marathi on December 16, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads