Header AD

राष्ट्रवादी कल्याण-डोंबिवली जिल्हा महिला कार्याध्यक्षाच्या मुलाला मारहाण दोघा आरोपींना अटक सीसीटीव्हीत घटना कैद
डोंबिवली , शंकर जाधव   :  राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कल्याण-डोंबिवली जिल्हा महिला कार्याध्यक्षा विनया पाटील याच्या मुलाला मारहाण केल्याचा प्रकार घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील मिलापनगर येथील युनिक चौक,आर.के.पटेल मार्टच्या समोर घडली.या हल्ल्यात पाटील याचा मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.मानपाडा पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक केली.राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष डॉ.वंडार पाटील आणि राजेंद्र नांदोस्कर यांनी रुग्णालयात जाऊन पाटील यांच्या मुलाच्या तब्बेतीची चौकशी केली.


मिळालेल्या माहितीनुसार,बबन पडवळ आणि त्याचा मुलगा शुभम पडवळ असे अटक आरोपींची नावे आहेत.तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कल्याण-डोंबिवली जिल्हा महिला कार्याध्यक्षा विनया पाटील यांचा मुलगा प्रथम यांच्या फिर्यादीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.विश्वनाथ पाटील यांच्याशी बबन आणि शुभम या दोघांबरोबर जुना वाद होता. या वादावरून दोघांनी प्रथम याला डोंबिवली पूर्वेकडील मिलापनगर येथील युनिक चौक,आर.के.पटेल मार्टच्या समोर येथे मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारामारी शुभमने दगड उचलून प्रथमच्या डोक्यावर व डाव्या कानाच्या मारला. 


या हल्ल्यात प्रथम जखमी झाला असून या झटापटीत प्रथमच्या गळ्यातील सोन्याची चैन तुटून पडली.त्यानंतर बबन आणि शुभम सदर ठिकाणाहून निघून गेले.जखमी प्रथमाला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांनी रुग्णालयात जाऊन प्रथमच्या तब्बेतीची चौकशी केली.मारहाण करणाऱ्या दोघा आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. दरम्यान घडलेला प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

राष्ट्रवादी कल्याण-डोंबिवली जिल्हा महिला कार्याध्यक्षाच्या मुलाला मारहाण दोघा आरोपींना अटक सीसीटीव्हीत घटना कैद राष्ट्रवादी कल्याण-डोंबिवली जिल्हा महिला कार्याध्यक्षाच्या मुलाला मारहाण दोघा आरोपींना अटक सीसीटीव्हीत घटना कैद Reviewed by News1 Marathi on December 14, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads