Header AD

लोकशाहीचे मूळ बहुजन हिताय बहुजन सुखायचा संदेश देणाऱ्या बौद्ध धम्मात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले


■केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते कोविड योद्ध्यांचा सत्कार....


मुंबई , प्रतिनिधी  :  लोकशाही जगाला भारताने दिली आहे.लोकशाही चे मूळ बहुजन हिताय बहुजन सुखाय चा उपदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांच्या बौद्ध धम्मात आहे असे  प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नारामदास आठवले यांनी नुकतेच बांद्रा येथे केले. 
 लॉकडाऊनच्या दुर्धर काळात  गरीब गरजूंची तसेच  रुग्णांची सेवा करणाऱ्या त्याचप्रमाणे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांचाही  कोरोनायोद्धा म्हणून ना.रामदास आठवले यांच्या हस्ते  सिद्धार्थ कॉलनी बांद्रा येथे सत्कार  करण्यात आला. यावेळी संविधानाची प्रास्ताविका आणि कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन कोरोनायोद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पनवेल महानगर पालिकेचे उप महापौर जगदीश गायकवाड , शिलाताई गांगुर्डे; अनिल गांगुर्डे; सिद्धार्थ कासारे; आयोजक रिपब्लिकन रोजगार आघाडी चे अध्यक्ष अमित तांबे;नागसेन कांबळे;हेमंत रणपिसे; ऍड. अभयाताई सोनवणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 


या वेळी समानतेचा हक्क ,अभिव्यक्ती स्वतंत्र,शोषणापासुन संरक्षणचे  हक्क,धार्मिक निवड व जगण्याचा हक्क या विषयावर  उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.कोविड योद्धा म्हणून डॉक्टर, पोलीस, अंगणवाडी सेविका,सफाई कामगार ,पत्रकार,खेळाडू यांचा सत्कार तडॉक्टर प्रवीण बांगर केईएम,दूरदर्शन चे प्रतिनिधी कलाकार जगताप;  खेळाडू सागर माळी; मनीष पाटील आदींचा  सत्कार करण्यात आला.यावेळी "स्टार महाराष्ट्र" या सप्ताहिकच्या  संविधान दिन विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
या वेळी  काव्यात बोलताना आठवले  केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले  म्हणाले...आज माझा निघून गेलेला आहे क्षीन कारण आहे आज संविधान दिन! पुढं ते म्हणाले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी  26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान लिहून पूर्ण  केले व देशाला दिले.संविधानामध्ये सर्वात जास्त योगदान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहे.


त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे खरे शिल्पकार आहेत.भारतीय संविधान हे आपल्या संसदीय  लोकशाही चा मजबूत पाया आहे. त्यामुळे भारतीय लोकशाही मजबूत आहे.आपल्या देशामध्ये वन मॅन,वन व्होट,वन व्हॅल्यू एक माणूस,एक मत, एक किंमत.. राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील किंवा सामान्य मजूर असतील,शेतकरी असतील सर्वांनाच समान अधिकार प्राप्त झालेला आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या कालखंडा पासून आलेली ही लोकशाही आहे. तेव्हा भिखु संघात वादविवाद व्हायचे त्या वेळी सर्वांचे मत जाणून घेतल्यावर बहुमताने निर्णय घेतला जायचा. या पद्धतीने महाकारुणी गौतम बुद्धांनी "बहुजन हिताय बहुजन सुखाय"ची शिकवण दिली होती. तीच शिकवण  संसदीय लोकशाही आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी आपल्या देशात बौद्ध धम्माच्या  भिक्खू संघात संसदीय लोकशाही होती याची ना. रामदास आठवले यांनी  आठवण करून दिली.ते पुढं म्हणाले आम्हाला अमेरिका युनायटेड किंगडम किंवा इतर देशांनी लोकशाही शिकऊ नये ही लोकशाही भारतातून इतर देशात गेली आहे.
 डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही मजबूत आहे असे म्हणत याचं उदाहरण देताना त्यांनी 1998 मधील अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार एका मतांनी हारले होते तेव्हा एका मताला किती किंमत असते हे त्या वेळी साऱ्या जागाने पाहिले आहे  इंडियन डेमोक्रॅसी इज दि बेस्ट डेमोक्रॅसी इन दि वल्ड असें उदगार त्यांनी काढले. या प्रसंगी बोलताना नागसेन कांबळे यांनी 6 डिसेंबर रोजी बाबासाहेबाना घरातूनच अभिवादन करण्याची विनंती केली . 
लोकशाहीचे मूळ बहुजन हिताय बहुजन सुखायचा संदेश देणाऱ्या बौद्ध धम्मात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले लोकशाहीचे मूळ बहुजन हिताय बहुजन सुखायचा संदेश देणाऱ्या बौद्ध धम्मात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले Reviewed by News1 Marathi on December 01, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नालेसफाईच्या कामांवर अतिरिक्त आयुक्तांचा अंकुश ठेवावा-शानू पठाण विपक्ष नेत्यांच्या दौर्‍यानंतर प्रशासन लागले कामाला

ठाणे (प्रतिनिधी) -   मे महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्यानंतरही नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच आपण नालेसफाई पाहणीचा दौरा केला. य...

Post AD

home ads