१३६वा कॉंग्रेस स्थापना दिवस डोंबिवलीत साजरा
डोंबिवली , शंकर जाधव : भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या १३६ व्या स्थापन दिन डोंबिवली साजरा झाला.डोंबिवली पश्चिमेकडील घनश्याम गुप्ते रोडवरील रोकडे बिल्डींगजवळील कॉंग्रेस कार्यालयात डोंबिवली विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष पमेश म्हात्रे,युवक कॉंग्रेस सरचिटणीस अखिलेश भोईर,डोंबिवली पश्चिम ब्लॉक युवक अध्यक्ष निवृत्ती जोशी,उपाध्यक्ष राजू सोनी,ज्येष्ठ पदाधिकारी निशिकांत रानडे,अभय तावरे,शरद भोईर,संजय पाटील,राकेश वायंगणकर,गौरव माळी,संदीप शहा, संतोष म्हात्रे,सुहास भेकरे, भावेश म्हात्रे आणि तेजस गडकरी यांनी साजरा केला. यावेळी पमेश म्हात्रे आणि अखिलेश भोईर यांनी कॉंग्रेस पार्टीने आजवर देशासाठी केलेल्या समाजिक कार्याची आणि सत्ता असताना देशासाठी केलेल्या कामाची थोडक्यात महिती दिली. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेस उत्तम काम करत असून हे सरकार आणखी चार वर्ष सरकार चालवेल असे सांगितले.

Post a Comment