Header AD

रात्री ११ नंतर बाहेर फिरणारयांवर पोलिसांची कारवाई

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर राज्य सरकारने खबरदारी उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर राज्यात रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात देखील पोलिसांनी संचारबंदीच्या दृष्टीने कठोर पावले उचलली आहेत. मंगळवारी रात्री ११ वाजल्यानंतर पोलिसांचा प्रचंड फौजफाटा रस्त्यावर उतरला.


नाक्या नाक्यावर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात देखील पोलिसांचा एक मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. नागरिकांना वाहनचालकांना संचारबंदी सुरू झाल्याने या काळात घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत होते. विना मास्क फिरणाऱ्यांवर देखील यावेळी पोलिसांनी कारवाई केली असल्याची माहिती कल्याण विभागाचे एसीपी अनिल पोवार यांनी दिली.


रात्री ११ नंतर बाहेर फिरणारयांवर पोलिसांची कारवाई रात्री ११ नंतर बाहेर फिरणारयांवर पोलिसांची कारवाई Reviewed by News1 Marathi on December 23, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोव्हिड-१९ पीडितांसाठी एमजीच्या ग्राहकांनी उभारला निधी

■ बायोडिग्रेडेबल बेडशीट केल्या दान; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उपक्रमाचे कौतुक ..   महाराष्ट्र, १८ मे २०२१ :  एमजी मोटर इंडियाने पुण...

Post AD

home ads