भिवंडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'एक वही एक पेन' उपक्रमातून केले अनोखे अभिवादन
भिवंडी , प्रतिनिधी : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे हजारो नागरिक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जात असतात. मात्र यंदा कोरोना संकट असल्याने नागरिकांनी घरातून तसेच आपआपल्या परिसरात विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून डॉ बाबासाहेबांना अभिवादन केले . विशेष म्हणजे दरवर्षी अनुयायी हार-फुले वाहून, मेणबत्ती प्रज्वलित करुन आदरांजली वाहतात. यामुळे मोठ्या प्रमाणात हार-फुले वाहिले जातात. हे हार-फुले दुसऱ्या दिवशी कुठल्याही उपयोगाचे न राहता कचरा म्हणून वाया जातात.
ही गोष्ट आर्थिक व पर्यावरणाच्या दृष्टीने चिंताजनक आहे. याचे गांभीर्य लक्षात घेता क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव पडघा विभाग यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषद मराठी शाळा पडघा येथे 'एक वही एक पेन' सामाजिक उपक्रम राबवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखे अभिवादन करण्यात आले. ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा अभावी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असते.
एकीकडे अभिवादनपर हार, फुलांचा खच पडतो तर दुसरीकडे आपले उद्याचे देशाचे भविष्य कोमेजून जाताना अत्यंत वेदनादायक असल्याचे दिसून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी अनुयायांनी चैत्यभूमी येथे न जाता यावर्षी पडघा येथे 'एक वही एक पेन' सामाजिक उपक्रम राबवून क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव पडघा विभाग यांच्या वतीने अनोखे अभिवादन करण्यात आले. 'एक वही एक पेन' या सामाजिक उपक्रमा अंतर्गत यावेळी पडघा परिसरातील नागरिकांनी आपल्या सहभागातून १५९५ वह्या तर १६७५ पेन अर्पण करून सामाजिक बांधिलकी जपत डॉ . बाबासाहेब आंबेडकरांना अनोखे अभिवादन केले.
भिवंडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'एक वही एक पेन' उपक्रमातून केले अनोखे अभिवादन
Reviewed by News1 Marathi
on
December 07, 2020
Rating:

Post a Comment