डोंबिवलीत अपंगाना मनसेचा आधार
डोंबिवली , शंकर जाधव : आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण आपले जीवन चांगले जगण्यासाठी धडपड करतो. मात्र अपंगाना सामान्य नागरिकापेक्षा जास्त धडपड करून संघर्षमयरित्या जीवन जगावे लागते.म्हणूनच सरकारी योजना त्यांच्यापर्यत पोहचाव्या आणि त्याचा फायदा त्यांना मिळावा म्हणून देशात कोठेही चालणारे एकच स्वावलंबन - युनिक कार्ड दिले जाते.त्यामुळे प्रत्येक अपंगांनी स्वावलंबन कार्ड काढणे आवश्यक आहे. डोंबिवलीत अपंगाना मनसेचा आधार देत मनसे नेते तथा आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डोंबिवली शहर सचिव अरुण जांभळे यांच्या माध्यमातून अपंगासाठी मोफत स्वावलंबन कार्ड शिबीर भरविण्यात आले होते. या शिबिराचा २२५ अपंग व्यक्तींनी लाभ घेतला.
या कार्यक्रमास जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर, नगरसेवक मंदार हळबे,महिला जिल्हाअध्यक्षा दीपिका पेंडणेकर,शहर अध्यक्षा मंदा पाटील, उपजिल्हा अध्यक्षा योगिनी पाटील,शहर सचिव कोमल पाटील,विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष सागर जेधे,शहर संघटक सुमेधा थत्ते,प्रतिभा पाटील,प्रशांत पोमेंडकर, हरिष पाटील,उपशहर अध्यक्ष राजू पाटील,श्रद्धा किरवे,सपना पाटील,सुहासिनी हरकुळकर,वर्षा शहा,संदीप ( रमा ) म्हात्रे,गणेश कदम,तेजस शेंद्रे,शर्मिला लोंढे,अश्विनी पाटील यासंह अनेक मनसैनिक उपस्थित होते. हे रंगीत कार्ड आधार कार्डप्रमाणे देशात एकच असणार आहे.
या कार्डवर अपंगांसाठी असलेल्या सुविधा देशात कोठेही घेता येणार आहेत. आधार कार्ड युनिक कार्डशी "लिंक‘ असेल. फोटोसह पूर्ण नाव, पत्ता, मोबाइल क्रमांकासह इतर माहिती कार्डवर असणार आहे अशी माहिती यावेळी डोंबिवली शहर सचिव अरुण जांभळे यांनी सांगितले.तर महिला जिल्हाअध्यक्षा दीपिका पेंडणेकर म्हणाल्या,सरकारी योजना आमच्या पर्यत पोहोचत नाही असे अपंगाचे म्हणणे आहे.त्यासाठी मनसेने आधार द्यावा असे अपंगांनी मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांच्याकडे मागणी केली.त्यावर मनसेने अपंगासाठी स्वावलंबन कार्ड शिबीराचे आयोजन केले. तर या शिबिरात,डोंबिवली,अंबरनाथ,बदलापूर,मुलुंड,घाटकोपर,चेंबूर,भांडूप आदी शहरातील अपंगांनी या शिबीराचा लाभ घेतला.

Post a Comment