Header AD

डोंबिवली विभागात आढळले ३९ वीज चोर वीज चोरीच्या बिलासह दहा लाखांचा दंड वसूल


■डोंबिवली विभागात वीज चोरीविरुद्ध सुरु असलेल्या मोहिमेची पाहणी करताना कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल...


कल्याण , प्रतिनिधी   :  महावितरणच्या डोंबिवली विभागात वीज चोरीविरुद्ध धडक मोहीम सुरु आहे. ९ डिसेंबरपासून सुरु असलेल्या या मोहिमेत वीजचोरी प्रकरणी ३९ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून वीज चोरीच्या बिलासह दहा लाखांपेक्षा अधिकचा दंड संबंधितांकडून वसूल करण्यात आला आहे. सुलभ प्रक्रियेद्वारे महावितरणकडून मिळणारी अधिकृत जोडणी घेऊनच विजेचा वापर करण्याचे आवाहन कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.


डोंबिवली पूर्व आणि पश्चिम, कोपर, ठाकुर्ली पूर्व आणि पश्चिम भागात मोहीम सुरु झाल्यापासून २६१० वीज जोडण्याची तपासणी करण्यात आली. यातील २६ ग्राहकांकडे वीजचोरी होत असल्याचे आढळून आले. त्यांच्याविरुद्ध वीज कायदा-२००३ चे कलम १३५ अन्वये कारवाई सुरु आहे. चोरिच्यत विजेचे ८ लाख ४७ हजार रुपये संबंधितांकडून वसूल करण्यात आले आहेत. तर या कारवाईला प्रतिसाद न देणाऱ्या दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय विजेचा अनधिकृत वापर करणाऱ्या १३ ग्राहकांविरुद्ध कलम १२६ नुसार कारवाई करून संबंधितांकडून दोन लाख एक हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम नियमितपणे सुरु राहणार आहे. मुख्य अभियंता अग्रवाल, अधीक्षक अभियंता सुनील काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली विभागातील अधिकारी, अभियंते, कर्मचारी या मोहिमेत सहभागी आहेत.


शहापूर तालुक्यात २५ लाखांची वीजचोरी उघड

शहापूर तालुक्यात ९ डिसेंबरपासून पासाने, बुढवादा, वाशाला, वेदिक, शिवाजीनगर (कसारा), आसनगाव, खर्डी, कसारा, वाशिंद परिसरात वीज चोरट्यांविरुद्ध मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ८६ ठिकाणी विजेचा चोरटा किंवा अनधिकृत वापर आढळून आला. संबंधितांकडून जवळपास २५ लाख रुपयांच्या २ लाख ४९ हजार युनिट विजेचा चोरटा वापर झाल्याचे निष्पन्न झाले असून कायदेशीर कारवाई सुरु आहे. उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांच्या नेतृत्वाखाली शहापूर तालुक्यात वीज चोरांविरुद्ध मोहीम सुरु आहे.


डोंबिवली विभागात आढळले ३९ वीज चोर वीज चोरीच्या बिलासह दहा लाखांचा दंड वसूल डोंबिवली विभागात आढळले ३९ वीज चोर वीज चोरीच्या बिलासह दहा लाखांचा दंड वसूल Reviewed by News1 Marathi on December 16, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads