मुसे संस्थे तर्फे कोलशेत खाडीवर क्लीन द क्रीक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
ठाणे , प्रतिनिधी : मुसे या संस्थेने खाडी किनारी राहणाऱ्या गावकरांच्या मदतीने खाडी किनारी स्वच्छता मोहीम हाती घेतली. रविवारी ठाण्यातील कोलशेत खाडी किनाऱ्यावरील कचरा उचलून तो परिसर स्वच्छता करण्यात आला. यावेळी ठाण्यातील खाडी किनारे स्वच्छ करून ते किनारे किती महत्वाचे आहे. याचे महत्व त्या परिसरातील नागरिकांना करून दिले. यावेळी प्लाटिक, लाकडी तुकडे,तुटलेले देव्हारे,पेपर,कपडे आणि प्लाटिक आणि काचेच्या बाटल्या जमा करण्यात आल्या.
हा उपक्रम असाच ठाण्यातील इतर खाडी किनारा राबवला जाणार आहे. हे खाडी किनारे स्वच्छ आणि नीटनेटके ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. याची जाणीव त्या परिसरातील प्रत्येकाला व्हावे, या उद्देशानुसार ही मोहीम राबवली जात आहे. तसेच महापालिका प्रशासनाने फक्त किनारे सुशोभीकरण करून तेथे कायमस्वरूपी कसे स्वच्छ रहातील याची ही तितकीच काळजी घ्यावी. ते स्वच्छ राहण्यासाठी काय करता येईल . याचा विचार करून त्यानुसार तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे संस्थेचे ...... यांनी बोलताना सांगितले. यावेळी मोठ्या प्रमाणात तरुण- तरुणी आणि स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला होता.

Post a Comment