भिवंडीत नायट्रोजन सिलेंडरचा स्फ़ोट,२ ठार, ४ कामगार गंभीर जखमी
भिवंडी , प्रतिनिधी : भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील पारसनाथ कंपाऊंड मधील इजी मॅकेनिकल कंपनीत नायट्रोजन सिलेंडरचा स्फ़ोट होऊन त्यामध्ये २ कामगारांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असून ४ कामगार गंभीर जखमी झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले आहे .
नारपोली पोलीस ठाणे हद्दीतील पारसनाथ कंपाऊंड गाळा नंबर बी-५ वळपाडा येथील जे.ई.मेकॅनिकल कंपनीमध्ये लोखंड कटिंग करण्यासाठी वापरला जाणारा नायट्रोजन गॅसच्या सिलेंडरचा दुपारी १.४० वा. च्या सुमारास स्फोट होण्याची दुर्घटना घडली .या स्फोटात प्रेम अनंता भोईर २४ वर्ष ,अक्षय अशोक गौतम २१ वर्ष या दोघांचा दुर्दैवी मृत्यु झाला असून मुनीर मोहम्मद हुसेन मोमीन रा.भिवंडी, विवेकानंदा बारीकी रा. वळपाडा भिवंडी, बजरंग शुक्ला रा.पारसनाथ कंपाऊंडया जखमीं वर मानकोली नाका येथील लोटस रुग्णालयात तर अल्पेश भोईर रा. वाडा यास ठाणे ज्युपिटर हॉस्पिटल येथे उपचारा करीता दाखल करण्यात आले आहे . दरम्यान घटनास्थळी नारपोली पोलीस दाखल होत त्यांनी अपघाताची नोंद केली आहे.चौकशी अंती या मध्ये दोषी असलेल्या बाबत माहिती समोर येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली आहे .
भिवंडीत जम्बो गॅस सिलेंडर मुळे 744 कुटुंबाला धोका.
भिवंडी तालुक्यातील काल्हेर ओसीया माता कंपाऊंड, 33 विंग असून एका इमारती 24 कुटुंब असे 744 कुटुंब राहतात,, 15 ते 20 फुटावर केमिकल गोदामे असून या ठिकाणी जम्बो गॅस सिलेंडरचा वापर केला जात असून आजच्या गॅसच्या स्फोटामुळे येथील 744 कुटुंबियांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होणार आहे त्यामुळे नारपोली पोलीस, महसूल, एमएमआरडीए विभागाने लक्ष देणे देण्याची मागणी समाजसेवक प्रकाश उमराडकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.. ,
भिवंडीत नायट्रोजन सिलेंडरचा स्फ़ोट,२ ठार, ४ कामगार गंभीर जखमी
Reviewed by News1 Marathi
on
December 09, 2020
Rating:

Post a Comment