कचोरे येथे वन विभागाची पूर्व सूचना न देता कारवाई
डोंबिवली , शंकर जाधव : कचोरे येथील वन विभागाच्या जागेवर बेकायदा घरे वसली असल्याचे सांगत ती तोडण्याची कारवाई गुरुवारी सकाळपासून वन विभागाच्या पथकाने सुरू केली आहे. मात्र भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी घटनास्थळी आले असता नागरिकांनी कारवाईच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. कोणतीही पूर्व सूचना आणि नोटीस न देता ही कारवाई केली जात होती.
स्थानिक भाजप नगरसेविका रेखा चौधरी यांनी त्यांनी कारवाईच्या ठिकाणी धाव घेत कारवाईला विरोध केला. मात्र पथकांना समजावण्याच्या प्रयत्न करूनही पथक कारवाई करत असल्याने चौधरी यांनी भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांना येथील संपूर्ण परिस्थितीबाबत माहिती दिली. आमदार चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारवाई थांबवा असे पथकाला सांगण्याचा प्रयत्न केला. घरातील नागरिकांना कारवाईपूर्वी नोटीसा दिलेल्या नाहीत. लोकप्रतिनिधींची बैठक घेतलेली नाही. या घरातील नागरिकांना वीज, पाणी पुरवठा दिला गेला आहे. ते घरपट्टी भरत असताना ही घरे बेकायदा कशी आहेत असा प्रश्न ही चव्हाण यांनी उपस्थित केला.

Post a Comment