वृत्तपत्र साठी लागणाऱ्या कागदावर सबसिडी व असंघटित कल्याणकारी महामंडळ लागू करण्यासाठी ची केली मागणी
ठाणे , प्रतिनिधी : राष्ट्रीय सल्लागार आमदार श्री संजय केळकर यांना कोरोणा योद्धा सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या ऑफिसमध्ये आज ऑल इंडिया न्यूजपेपर डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनचे चेअरमन संजीव केरनी, अध्यक्ष बब्बरसिंग चौहान, सचिव दत्ता घाडगे यांच्यासह मीटिंग झाली. या बैठकीमध्ये सर्व वृत्तपत्र विक्रेते व वृत्तपत्रांचे मालक हे एकत्र येऊन वृत्तपत्र विक्रेत्यांच्या हितासाठी काम करावे असे ठरले. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीमध्ये राष्ट्रीय संघटनेचे पदाधिकारी व वृत्तपत्रांचे मालक यांची एकत्र बैठक घेऊन त्यामध्ये पेपर छापाईसाठी लागणाऱ्या कागदावर 50 टक्के सबसिडी मिळावी.
असंघटित कल्याणकारी महामंडळामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांना सामावून घेऊन ते प्रत्येक राज्यात त्वरित लागू करावे, 15 ऑक्टोबर हा वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून केंद्र सरकारतर्फे जाहीर करावा, या तीन मागण्या घेऊन राष्ट्रीय संघटना व वृत्तपत्रांचे मालक यांचं एक प्रतिनिधी मंडळ केंद्र शासनाने या मागण्यांचे निवेदन देणार आहे. आणि या मागण्या त्वरित मंजूर करावे अशी मागणी करणार आहे. या राष्ट्रीय संघटनेची बैठक निघालेल्या विषयामुळे वृत्तपत्र समूह व वृत्तपत्र विक्रेते उत्साहित झाले आहेत. लवकरच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्ली येथे होणाऱ्या बैठकीसाठी राष्ट्रीय संघटनेतर्फे सर्व वृत्तपत्र समूहाच्या मालकांना बैठकीचे निमंत्रण देण्यात येणार आहे असे राष्ट्रीय अध्यक्ष बब्बरसिंग चौहान यांनी सांगितले.

Post a Comment