Header AD

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा कवाडची यात्रा रद्द सव्वाशे वर्षाची परंपरा खंडित


भिवंडी ,  प्रतिनिधी  :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन आणि विश्वस्त संस्थेने सव्वाशे वर्षाची परंपरा असणारी कवाडची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने यावर्षी सदर उत्सव साधेपणाने साजरा होणार आहे.
दरवर्षी पौष पौर्णिमेला दत्तजयंतीच्या दिवशी ही यात्रा भरत असते या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  सरकारने धार्मिक उत्सवांना आणि यात्रांना परवानगी न दिल्याने ही यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती श्री चिद्घन स्वामी देवस्थान समितीचे केशव लेले यांनी दिली मात्र पारंपरिक सर्व धार्मिक विधी होणार असल्याचे सांगितले. निर्णयामूळे यात्रेची सव्वाशे वर्षाची परंपरा खंडित होणार आहे. 


भिवंडी तालूक्यातील कवाड येथे श्री चिद्घन स्वामी सखाराम यांचे समाधी मंदीर असुन या ठिकाणी दत्तजयंती निमित्त सलग तीन दिवस येथे यात्रा भरत असुन महिनाभर आधी कवाड ते आळंदी अशी पायी दिंडी काढली जाते आणि भजन किर्तनाच्या जयघोषात हि दिडीं आळंदीला पोहचते,त्यानंतर दत्तजयंती आधी चार दिवस मंदिरात हरीपाठ,भजन, कीर्तन,होम हवन,व शेवटच्या दिवशी काल्याच कीर्तन,भंडारा असे कार्यक्रम होतात याच वेळी मोठ्या प्रमाणात जिल्ह्याभरातून भक्तगण या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.
 या वर्षी कोरोनामूळे खबरदारीचा उपाय म्हणून ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्याचबरोबर दरवर्षी होणारे कुस्तीच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थ राजेंद्र काबाडी यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा कवाडची यात्रा रद्द सव्वाशे वर्षाची परंपरा खंडित कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा कवाडची यात्रा रद्द सव्वाशे वर्षाची परंपरा खंडित Reviewed by News1 Marathi on December 28, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नगरसेवक उमेश पाटील यांच्या हस्ते रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करण्याची शुभारंभ

कळवा  , अशोक  घाग  :   प्रभाग क्रमांक 9 स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांच्या प्रभाग सुधारणा निधीतून खारीगाव येथील दत्तवाडी परिसरातील विघ्नहर्त...

Post AD

home ads