Header AD

रेड बुल कॅम्‍पस् क्रिकेटतर्फे २०२१ मध्‍ये वुमेन्‍स चॅम्पियनशीपचे आयोजन
मुंबई , ९ डिसेंबर २०२० :  जगातील सर्वात मोठी युनिव्‍हर्सिटी-स्‍तरीय क्रिकेट स्‍पर्धा पहिल्‍यांदाच महिलांसाठी स्‍पर्धेचे आयोजन करणार आहे, ज्‍याची सुरूवात भारतातील चॅम्पियनशीपसह होणार आहे. रेड बुल कॅम्‍पस् क्रिकेट वर्ष २०२१ मध्‍ये भारतात वुमेन्‍स चॅम्पियनशीप खेळवण्‍यासाठी सज्‍ज आहे. जगातील सर्वात मोठी युनिव्‍हर्सिटी-स्‍तरीय क्रिकेट स्‍पर्धा रेड बुल कॅम्‍पस् क्रिकेट खेळाडूंना त्‍यांच्‍या कॉलेज संघाचे प्रतिनिधीत्‍व करण्‍याची आणि वर्ल्‍ड फायनल्‍समध्‍ये त्‍यांच्‍या देशाचे प्रतिनिधीत्‍व करण्‍याची संधी देते.


वर्ष २०२१ मध्‍ये पहिल्‍यांदाच भारतामध्‍ये महिलांसाठी स्‍पर्धा खेळवण्‍यात येणार आहे. राष्‍ट्रीय महिला संघाची सलामीवीर फलंदाज स्‍मृती मंधानाचा या स्‍पर्धेला प्रबळ पाठिंबा आहे. रेड बुल अॅथेलीट स्‍मृती मंधाना म्‍हणाली, ''मला आनंद होत आहे की, रेड बुल कॅम्‍पस् क्रिकेट पुढील वर्षी महिलांसाठी स्‍पर्धा खेळवणार आहे. व्‍यावसायिक स्‍तरावर क्रिकेट खेळण्‍याची महत्त्वाकांक्षा असलेल्‍या भारतीय महिलांसाठी हे उत्तम व्‍यासपीठ ठरेल. अनेक खेळाडूंना त्‍यांच्‍या राज्‍याच्‍या संघांमध्‍ये निवडण्‍यात आले आहे आणि ते रेड बुल कॅम्‍पस् क्रिकेट खेळल्‍यानंतर राष्‍ट्रीय संघांसाठी खेळले आहेत. केएल राहुल, मयंक अग्रवाल, करूण नायर, मनन वोहरा, अनुकूल रॉय असे खेळाडू रेड बुल कॅम्‍पस क्रिकेट खेळले आहेत. महिलांसाठी खेळवण्‍यात येणा-या स्‍पर्धेमुळे भारतातील महिला क्रिकेटला उत्तम चालना मिळेल.'' 


यापूर्वी रेड बुल कॅम्‍पस् क्रिकेटमध्‍ये अविश्‍वसनीय भारतीय प्रतिभावान खेळाडू खेळले आहेत, जसे केएल राहुल, मयंक अग्रवाल, मनन वोहरा, शार्दुल ठाकूर, करूण नायर, शशांक सिंग, सिद्धेश लाड, हिमांशू राणा, अभिमन्‍यू ईश्‍वरन, अनुकूल रॉय, रुतूराज गायकवाड, रिकी भुई. आंतरराष्‍ट्रीय स्‍टार खेळाडू एडन मार्करम, लुंगी एनगिडी, निरोशन डिकवेला आणि चिराग सुरी हे त्‍यांच्‍या संबंधित देशांचे प्रतिनिधीत्‍व करण्‍यापूर्वी रेड बुल कॅम्‍पस् क्रिकेटमध्‍ये देखील खेळले. स्‍पर्धा आता २०२१ पासून महिला क्रिकेटमधील भावी स्‍टार खेळाडूचा शोध घेण्‍यास सज्‍ज असणार आहे. महिला क्रिकेट स्‍पर्धा उत्तर, दक्षिण, पूर्व व पश्चिम या चार विभागांमध्‍ये खेळवण्‍यात येणार आहे. विभागीय पर्वांचे विजेते संघ नॅशनल फायनल्‍समध्‍ये खेळतील. नॅशनल फायनलमधील विजेत्‍या संघाला भारतातील सर्वोत्तम महिला क्रिकेट संघ म्‍हणून घोषित करण्‍यात येईल. 


वुमेन्‍स चॅम्पियनशीपमध्‍ये सहभाग घेणा-या काही खेळाडूंना स्‍मृती मंधानासोबत चर्चा करण्‍याची अद्वितीय संधी देखील मिळेल.रेड बुल कॅम्‍पस् क्रिकेट २०२० इंडिया फायनल्‍स सध्‍या लखनौमध्‍ये सुरू आहेत. जैन कॉलेज (बेंगळुरू), वायबीएन कॉलेज (रॉची), एसएस जैन सुबोध कॉलेज (जयपूर), डीएव्‍हीव्‍ही कॉलेज (इंदौर), डीएव्‍ही कॉलेज (जालंधर), न्‍यू एलजे कॉलेज (अहमदाबाद), लोयला कॉलेज (चेन्‍नई) आणि एसओए युनिव्‍हर्सिटी (भुवनेश्‍वर) हे संघ इंडिया चॅम्पियन्‍स बनण्‍याच्‍या आशेसह नॅशनल फायनल्‍समध्‍ये सहभाग घेत आहेत. राजस्‍थान रॉयल्‍समधील प्रशिक्षक व खेळाडू देखील नॅशनल फायनल्‍समध्‍ये उपस्थित आहेत आणि ते पुढील वर्षी संघाच्‍या ट्रायल्‍समध्‍ये निवड होण्‍याकरिता खेळाडूंना मार्गदर्शन करतील. 

रेड बुल कॅम्‍पस् क्रिकेटतर्फे २०२१ मध्‍ये वुमेन्‍स चॅम्पियनशीपचे आयोजन रेड बुल कॅम्‍पस् क्रिकेटतर्फे २०२१ मध्‍ये वुमेन्‍स चॅम्पियनशीपचे आयोजन Reviewed by News1 Marathi on December 09, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या ध्येयपूर्ती पुस्तकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   दिलीप  गुंड यांचे "ध्येयपूर्ती" हे पुस्तक ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला आशादायी व प्रेरणादायी असे...

Post AD

home ads