Header AD

कल्याण डोंबिवली जिल्ह्यातून राष्ट्रवादी संकलित करणार ५०० बाटल्या रक्त
कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  सध्या महाराष्ट्रात भासत असलेल्या रक्ताच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्त्य साधून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून सुमारे ५०० बाटल्या रक्त संकलित करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष वंडार पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील उपस्थित होते.   


कल्याण पश्चिमेतील कल्याण स्पोर्ट्स क्लब येथे राष्ट्रवादी जिल्ह्याच्या वतीने शरद पवार यांच्या वाढदिवसाचा सोहळा संपन्न होत आहे. यामध्ये राज्यात मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला असूनराज्य शासनाने रक्तदानाचे आवाहन केलेले आहे. त्यानुषंगाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित केलेले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी रक्तदान करणार असूनसुमारे ३०० बाटल्या रक्तदान केले जाईल. त्याचप्रमाणे कल्याण आणि डोंबिवली मध्ये इतर पदाधिका-यांनी अजून दोन ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. यानिमित्ताने कल्याण- डोंबिवली शहरातून ५०० बाटल्या शासनाला रक्तपुरवठा करण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले.


तर सकाळी १० वाजता काही मान्यवर मंडळी शरद पवार यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन त्यांनी अनुभवलेले समग्र शरद पवार आपल्या भाषणातून व्यक्त करतील. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने यशवंतराव चव्हाण सेंटरमुंबई येथे वाढदिवसाचा मुख्य सोहळा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. या सोहळ्याचे एल ई. डी. स्क्रीन च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण कल्याण स्पोर्ट्स क्लब येथे दाखवण्यात येणार आहे.


आजपर्यंत शरद पवारांच्या वाढदिवसाचा प्रत्येक सोहळा नेत्रदीपकच झाला आहे. मग ते दिल्लीत साजरा झालेला ७५ वा वाढदिवस असो वा ५० वा वाढदिवस असो. त्या प्रत्यके वाढदिवसाला कार्यकर्त्यांना काहीना काही उर्जा मिळत गेली आहे. तीच उर्जा आमच्या शहरातील प्रत्येक कार्यकर्त्याला मिळावी व त्या सोहळ्याचा प्रत्येक सहकारी साक्षीदार व्हावा व कल्याण शहरातील नागरिकांनाही हा सोहळा अनुभवता यावा म्हणून या ठिकाणी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जगन्नाथ शिंदे यांनी दिली.

कल्याण डोंबिवली जिल्ह्यातून राष्ट्रवादी संकलित करणार ५०० बाटल्या रक्त कल्याण डोंबिवली जिल्ह्यातून राष्ट्रवादी संकलित करणार ५०० बाटल्या रक्त Reviewed by News1 Marathi on December 10, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यातील लॉज व हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

■अनधिकृत बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाईची छायाचित्रे... ठाणे , प्रतिनिधी  :    ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये ...

Post AD

home ads