राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी जखमी प्रथमच्या तब्बेतीची केली चौकशी
डोंबिवली , शंकर जाधव : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कल्याण –डोंबिवली जिल्हा महिला कार्याध्यक्षा विनया पाटील यांचा मुलगा प्रथमवर दोन दिवसांपूर्वी झालेल्या हल्ला झाला होता.मानपाडा पोलिसांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप करत विनया पाटील यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांच्या अश्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती.या घटनेची माहिती राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांना समजताच मंगळवारी रुग्णालयात जाऊन प्रथमच्या तब्बेतीची चौकशी केली.तर मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनी दादाहरी चौरे यांना संपर्क साधून हल्लेखोरांवर कडक कारवाई करा अशी मागणी केली.

Post a Comment