Header AD

खाडीमध्ये अडकलेल्या २ चिमुकल्यांचा स्थानिकांनी वाचवला जीव

 कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  कल्याण-ठाकुर्ली रोडवर असणाऱ्या कचोरे गावातील स्थानिक सोमवारी समोर आलेल्या विचित्र घटनेने हादरून गेले. कचोरे खाडीमध्ये अडकलेल्या २ चिमुरड्यांचा स्थानिक नागरिकांनी जीव वाचवला. यामध्ये एका सहा महिन्यांच्या तान्ह्या बाळाचाही समावेश आहे. हे दोघे खाडीमध्ये याठिकाणी नेमके आले कसे याबाबत ठोस माहिती नसली तरी एक महिला या दोघांना खाडीतील बेटावर सोडून निघून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र त्याबद्दल अधिकृत कोणतीही माहिती मिळालेली नाही.


सोमवारी दुपारी २ ते अडीच वाजण्याच्या सुमारास कचोरे गावातील स्थानिकांना खाडीतील बेटावर दोन लहान मुलं दिसली आणि त्यांना एकच धक्का बसला. त्यातील एक जण साधारणपणे २-३ वर्षांचा तर दुसरा तर अक्षरशः सहा महिन्यांचे तान्हे बाळ होते. गंभीर बाब म्हणजे  खाडीला भरती सुरू झाली होती आणि हे दोन्ही चिमुकले असणारे ठिकाण आणि खाडीच्या पाणीमध्ये अवघ्या काही इंचाचाच फरक राहिला होता.


 कचोरे गावातील स्थानिक रहिवासी गणेश मुकादमअमित मुकादम आणि तेजस मुकादम यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी धाव घेत या दोघांनाही सुखरूपपणे खाडीच्या बाहेर काढले. या मुलांना बाहेर काढण्यात थोडासा जरी विलंब झाला असता तर या चिमुकल्यांच्या जीवावर बेतले असते.


तर या दोघांना इकडे कोण सोडून गेलेआणि का सोडून गेले हे प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत. दरम्यान याप्रकरणी स्थानिकांनी पोलिसांनाही माहिती देण्यात आली असून या दोन्ही मुलांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे समजते.

खाडीमध्ये अडकलेल्या २ चिमुकल्यांचा स्थानिकांनी वाचवला जीव खाडीमध्ये अडकलेल्या २ चिमुकल्यांचा स्थानिकांनी वाचवला जीव Reviewed by News1 Marathi on December 08, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यातील लॉज व हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

■अनधिकृत बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाईची छायाचित्रे... ठाणे , प्रतिनिधी  :    ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये ...

Post AD

home ads