Header AD

१जानेवारी फुले दांम्पत्य सन्मान दिवस गावा-गावात साजरा करावा सचिन गुलदगड
कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षातील सर्व महापुरूषांच्या जयंती आणि पुण्यतिथी व विविध ऊत्सव कार्यक्रम विविध ठिकाणच्या आयोजकांनी रद्द केले. याच श्रुंखलेत पुणे येथे दरवर्षी १ जानेवारीला  आयोजीत होणारी १ जानेवारी फुले दांम्पत्य सन्मान दिवस महारॅली” यंदाच्या वर्षी आयोजकांना स्थगीत करावी लागली व प्रातिनिधीक  स्वरूपात  स्थानिक कार्यकर्त्यांनी भिडेवाडा व फुलेवाडा येथे जाऊन वंदन करावे तसेच महाराष्ट्रातील ईतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या स्थानीक ठीकाणि कोविड १९ च्या नियमाधिन राहुन हा ऊत्सव साजरा करावा. असे आवाहन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड यांनी केले आहे.


१ जानेवारी १८४८ रोजी महात्मा जोतीराव फुले व माता सावित्रीआई फुले यांनी पहिली मुलींची शाळा भिडेवाडा पुणे येथे सुरू केली होती. या दिवसाचे व कार्यांचे औचित्य साधुन ही महारॅली दरवर्षी आयोजित करण्यात येत होती. यंदाच्या वर्षी ही महारॅली स्थगीत करण्यात आली आहे. म्हणुन गावागावात स्थानिक ठिकाणी हा ऊत्सव दिवस साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे.१ जानेवारी फुलेदांम्पत्य सन्मान दिन ते ३ जानेवारी माता सावित्री फुले जन्मदिन ( महिला शिक्षक दिन) त्रीदिवसीय सप्ताहाचे आयोजन करावे.


या सप्ताहा मधे कोविड १९ च्या नियमाच्या अधिन राहुन रांगोळी स्पर्धावक्तृत्व स्पर्धानिबंध स्पर्धा तसेच ईतर ऊपक्रम राबवावे. तसेच इतर विविध ऊपक्रमा मार्फत हा ऊत्सव साजरा करावा असे आवाहन संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड यांनी केले असल्याची माहिती युवक संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विनोद शेलकर यांनी दिली.

१जानेवारी फुले दांम्पत्य सन्मान दिवस गावा-गावात साजरा करावा सचिन गुलदगड १जानेवारी फुले दांम्पत्य सन्मान दिवस गावा-गावात साजरा करावा सचिन गुलदगड Reviewed by News1 Marathi on December 29, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नालेसफाईच्या कामांवर अतिरिक्त आयुक्तांचा अंकुश ठेवावा-शानू पठाण विपक्ष नेत्यांच्या दौर्‍यानंतर प्रशासन लागले कामाला

ठाणे (प्रतिनिधी) -   मे महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्यानंतरही नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच आपण नालेसफाई पाहणीचा दौरा केला. य...

Post AD

home ads