पुण्याच्या मुलींची भिवंडीत ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी साखरशाळा
भिवंडी , प्रतिनिधी : ऊसतोडणी मजुर तोडणीसाठी सतत स्थलांतर करीत असतात त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडत असतो त्यामुळे ही मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून या मुलांसाठी साखरशाळा हा उपक्रम महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येतो.परंतु पुण्याच्या दोन मुलींनी चक्क आपल्या गावाकडील शेतावरच या ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी शासनाची मदत न घेता साखरशाळा हा उपक्रम राबविल्याने त्यांच्या या उपक्रमाची दखल मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव विकास खरगे,साखरआयुक्त शेखर गायकवाड, मानवाधिकार आयोग सदस्य ज्ञानेश्वर मुळे,बिवीजी ग्रुपचे हणमंतराव गायकवाड, जीएसटी कमिशनर वैशाली पतंगे यांनी घेऊन त्यांचे कौतुक केले.
पुण्याच्या अश्विनी आणि रणजित दरेकर यांची ठाणे जिल्ह्यातील पडघा येथे शेती आहे.ते गेली चार वर्षे या शेतातील १४ एकर जमीनीवर यशस्वी उसाचे उत्पादन घेत आहेत.यावर्षीसुद्धा त्यांनी ऊस लागवड केली आणि ते तोडण्यासाठी त्यांनी मालेगाव येथून ऊसतोडणी मजूर आणले होते या मजुरांसोबत त्यांची जवळपास २२ ते २५ मुलेही सोबत आली होती. .लॉकडाऊनमुळे सतत घरी असल्याने त्यांनी यावेळी आपली मुलगी दिविजा दरेकर वय ११ वर्षे हिला सोबत आणले होते.दिविजा रोज या मुलांसोबत खेळत असत त्यावेळी ती त्यांना गोष्टी गाणी बोलून दाखवत असत तेव्हा तिला वाटले की आपण यांना आपल्याला शाळेत जे शिववितात ते थोडंफार शिकवू शकतो त्यावेळी तिने आपल्या आईच्या संमतीने आपली मैत्रीण सेजल पवार वय १३ वर्षे हिलाही आपल्या शेतावर बोलवून घेतले आणि त्यांनी तिथेच त्यांनी साखरशाळा उपक्रमास सुरुवात केली.
दिविजा आणि सेजलने याठिकाणी असलेल्या ३ ते १३ वर्षीय मुलांना रोज सकाळी लवकर उठून प्रार्थना त्यानंतर योगासने, सूर्यनमस्कार करण्यास शिकवले त्यानंतर या दोघींनी त्यांच्याबरोबर विविध प्रकारचे खेळ खेळू लागल्या त्यामुळे सुरुवातीला लाजणारी ही मुले त्यांच्यात एकरूप होऊन गेली. तेव्हा त्यांना मराठी आणि इंग्रजी अक्षरओळख,अंकओळख,चित्रकला, वेगवेगळे साहित्य वापरून कागदावर चित्र बनविणे,दगडावर कलरच्या साहाय्याने चित्र काढणे,कागदी वस्तू बनविणे अश्या प्रकारचे शिक्षण रोज देऊ लागल्या.याशिवाय त्यांनी या मुलांना आहाराचे महत्त्व, स्वच्छतेचे महत्व,आरोग्य शिक्षणाचे महत्व आदी रोज समजावून दिले.यामुळे या मुलांमध्येही आमूलाग्र बदल होऊन त्यांच्यात आत्मविश्वास आला.सतत १५ दिवस या मुलांना त्यांनी रोज शिक्षण दिले. यावेळी त्या दोघीच रोज काय शिकवायचं,काय ऍक्टिव्हिटी घ्यायची याच नियोजन त्या स्वतः करीत होत्या.यावेळी कधीकधी त्यांना स्वतःच्या चूकाही लक्षात येत होत्या त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्यात त्या बदल करीत असत.
दिविजा आणि सेजल घेत असलेल्या साखरशाळेची माहिती मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव विकास खरगे यांना समजल्यावर त्यांनी या दोघींचे कौतुक करून भिवंडीतील आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून या सर्व मुलांची आरोग्य तपासणी करून घेतली आणि मुलांना शिक्षणाचे आणि आरोग्याचे महत्व समजावून सांगितले त्याचबरोबर या ऊसतोडणी मजुरांना बालविवाह, आरोग्य आणि शिक्षण याबद्दल माहिती दिली.
पुण्याच्या मुलींची भिवंडीत ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी साखरशाळा
Reviewed by News1 Marathi
on
December 15, 2020
Rating:

Post a Comment