गोव्या मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन उभारणार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट
मुंबई दि. २१ : मागासवर्गीयांच्या विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबाजवणी चा आढावा घेण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी गोवा राज्याचा दोन दिवसांच्या दौरा केला. त्यात त्यांनी आज गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची पणजी येथे भेट घेतली. यावेळी गोव्या मध्ये राज्य सरकार तर्फे लवकर डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यात येईल अशी ग्वाही गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ना रामदास आठवले यांना दिला.तसेच गोवा राज्य सरकार मध्ये रिपब्लिकन पक्षाला सत्तेतील सहभाग देण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ना रामदास आठवले यांच्याशी झालेल्या चर्चेत दिले.

Post a Comment