Header AD

अवकाळी पावसामुळे भिवंडीत वीटभट्टी मालांचे प्रचंड नुकसान विटभट्टी मालकांना शेतक-यांप्रमणे नुकसान भरपाई मिळावी सभापती कुंदन पाटील


भिवंडी , प्रतिनीधी  :  भिवंडी तालुक्याती सर्व वीटभट्टी मालक दर वर्षी वीटभट्टीला लागणाऱ्या मातीची रॉयल्टी भरतो मात्र दर वर्षी अवकाळी पावसामुळे वीटभट्टी मालाचे नुकसान होत असते परंतू या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे सर्व वीटभट्टी मालकांचे मालाचे फार मोठे नुकसान झाले आहे.


यापुर्वी शासनाकडे कधीच नुकसान भरपाई मागण्यात आली नाही परंतु मागच्या वर्षी कोरोनाच्या आजारामुळे लाॅक डाऊन झाले आणि वीटभट्टीचे धंदे फेब्रुवारीपासून बंद झाले नऊ-दहा महिने वीटभट्टी धंदे बंद होते त्यामुळे वीटभट्टी मालकांना फार मोठे आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले.या वर्षी नव्याने वीटभट्टी धंद्याला सुरुवात नोव्हेंबर पासून झाली मात्र अचानक अवकाळी पाऊस पडल्यामुळे वीटभट्टी मालाचे नुकसान झाल्याने विटभट्टी मालक हवालदील झाला आहे.त्यामुळे जशी शेतकऱ्यांवर अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानामुळे शेतकऱ्याला आत्महत्येची वेळ येते तशी वेळ आता विटभट्टी मालकांवर आली आहे.


त्यामुळे प्रशासनाने विटभट्टी मालकांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी कोकण विभागीय वीट उत्पादक व वाहतूक चालक मालक संघटना तथा ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती कुंदन पाटील‌ यांनी प्रांत अधिकारी डाॅ.मोहन नळदकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी शिवसेना तालुका सचिव राजेंद्र काबाडी,शिवसेना उपतालुका प्रमुख नितीन जोशी, कोकण विभागीत खजिनदार अनंता‌ माळी,जिल्हा अध्यक्ष शंकर खारीक,तालुका अध्यक्ष सुभाष भामरे,तालुका संघटक संभाजी पाटील इतर पदाधिकारी उपस्थित होते.
अवकाळी पावसामुळे भिवंडीत वीटभट्टी मालांचे प्रचंड नुकसान विटभट्टी मालकांना शेतक-यांप्रमणे नुकसान भरपाई मिळावी सभापती कुंदन पाटील अवकाळी पावसामुळे भिवंडीत वीटभट्टी मालांचे प्रचंड नुकसान विटभट्टी मालकांना शेतक-यांप्रमणे नुकसान भरपाई मिळावी सभापती कुंदन पाटील Reviewed by News1 Marathi on December 14, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads