Header AD

कोरोना काळात उत्तम काम करणाऱ्या कामा संघटनेचे राज्यपालांन कडून कौतुक
डोंबिवली , शंकर जाधव  : करोना महामारीत कल्याण अंबरनाथ मॅन्यूफॅक्चर असोसीएशन (कामा संघटना) ने तब्बल ११ कोटी ३५ लाख रुपयाची मदत केली. याची दखल घेत राज्यपाल भगतसिग कोशारी यांनी कामा संघटनेचे कौतुक केले. करोना काळातील योगदानाबाबतचे प्रशस्तीपत्र राज्यपालांनी संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांच्या नावे दिले कामा संघटनेकडून कायमच लोकोपयोगी कामासाठी आर्थिक पाठबळ दिले. कामगाराच्या हितासाठी कामा संघटना कायम प्रयत्नशील असते. 


करोना महामारीच्या काळात कामा संघटनेकडून मुख्यमंत्री फंडात ४ कोटीची मदत देण्यात आली, तर पंतप्रधान फंडात ६ लाख ७६ हजार,  शहरात फवारणीसाठी २ कोटी २६ लाखाचे सोडियम हायपोक्लोराईड, ३ कोटी ६३ लाखाचे सनीटायजर, कस्तुरबा रुग्णालयात ३ तर हाफकिन इन्स्टिट्यूट मध्ये ४ असे ७१ लाखाचे ७ व्हेटीलेटर याखेरीज फेस मास्क, आरोग्य कर्मचारी आणि गरीब नागरिकांना अन्न पाकिटे, तापमापके, फेस शिल्ड आणि पीपीई कीट, रुग्णालयांना बेडशिट उपलब्ध करून देण्यासाठी ११ कोटी ३५ लाखाचा निधी उपलब्ध करून  देण्यात आले संघटनेच्या या लोकोपयोगी कामाची दखल घेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी संघटनेचे कौतुक करत प्रशस्तीपत्र देऊन  गौरविले. 


दरम्यान या कौतुकाने समाजसेवा करण्यास कामा संघटनेला अधिकाधिक बळ मिळाल्याचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी पत्रकारांना सांगितले. 


कोरोना काळात उत्तम काम करणाऱ्या कामा संघटनेचे राज्यपालांन कडून कौतुक कोरोना काळात उत्तम काम करणाऱ्या कामा संघटनेचे राज्यपालांन कडून कौतुक Reviewed by News1 Marathi on December 07, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यातील लॉज व हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

■अनधिकृत बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाईची छायाचित्रे... ठाणे , प्रतिनिधी  :    ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये ...

Post AD

home ads