Header AD

भिवंडीत बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यात पोलीस अपयशी झाल्याने नातेवाईकांचा उपायुक्त कार्यालया समोर ठिय्या

भिवंडी  , प्रतिनिधी  :  भिवंडीतील घुंगट नगर येथे राहत असलेला कृष्णा उर्फ टोनी केशरवाणी हा तरुण मागील पाच दिवसांपासून बेपत्ता आहे. पोलीस तरुणाचा शोध लावण्यास अपयशी होत असल्याचा आरोप करत कृष्णाच्या नातेवाईकांनी भिवंडी पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर मंगळवारी ठिय्या मांडला, नातेवाईकांनी अचानक केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. 


कृष्णा उर्फ टोनी केशरवाणी असं बेपत्ता तरुणाचं नाव असून तो पाच दिवसांपासून बेपत्ता आहे. कृष्णाला फोन आल्यानंतर तो वीस हजार रुपये घेऊन घरातून बाहेर निघाला होता, परंतु आज पाच दिवस उलटून देखील कृष्णाचा पत्ता लागला नसल्याने संतप्त नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांनी भिवंडी वाडा मार्ग एक तास रोखून धरला होता.


तसेच भिवंडी पोलिस उपायुक्त कार्यालया समोर पोलिस प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली अखेर पोलिसांच्या मध्यस्थी नंतर या नातेवाईकांना चर्चा करण्यास बोलावण्यात आले, परंतु यावेळी संतप्त जमावाने पोलिसांसमोर जोरदार घोषणाबाजी केली. अखेर भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौघुले यांच्या बरोबर झालेल्या चर्चेनंतर नातेवाईकांना समज देऊन घरी पाठवण्यात आले. पोलिसांच्या वतीने सध्या बेपत्ता झालेल्या कृष्णाचा शोध घेतला जात आहे.
भिवंडीत बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यात पोलीस अपयशी झाल्याने नातेवाईकांचा उपायुक्त कार्यालया समोर ठिय्या भिवंडीत बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यात पोलीस अपयशी झाल्याने नातेवाईकांचा उपायुक्त कार्यालया समोर ठिय्या Reviewed by News1 Marathi on December 29, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोव्हिड-१९ पीडितांसाठी एमजीच्या ग्राहकांनी उभारला निधी

■ बायोडिग्रेडेबल बेडशीट केल्या दान; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उपक्रमाचे कौतुक ..   महाराष्ट्र, १८ मे २०२१ :  एमजी मोटर इंडियाने पुण...

Post AD

home ads