डोंबिवलीतील चिऊ पार्कला आमदार राजू पाटील यांनी दिली भेट
डोंबिवली , शंकर जाधव : डोंबिवलीतील पहिल्यावहिल्या चिऊ पार्कची मनसे आमदार राजू पाटील यांनी भेट दिली. `चिऊ पार्क` म्हणजे चिमण्यांसाठी सुरक्षित असा बगीचा डोंबिवली पश्चिमच्या ध्येयवेड्या निसर्गप्रेमी सदस्यांनी २०१६ रोजी तयार केला. निसर्गप्रेमी लोकांना एकत्र आणून दावडी,उंबार्ली या टेकड्यांवर नाशिकचा धर्तीवर बोटॅनिकल गार्डन बांधण्याचा संकल्प आमदारांनी केला आहे, त्या धर्तीवर तिथे पक्षी,फुलपाखरे,प्राणी यांना पूरक अशी कुठल्या प्रकारच्या वनस्पतीची,झाडांची लागवड करता येईल याची माहिती ह्या अनुभवी व तज्ञ मंडळींकडून घेण्यासाठी व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली पश्चिमच्या सदस्यांच्या निमंत्रणावरुन डोंबिवली घरडा सर्कल जवळील कॅप्टन विनयकुमार सच्चान स्मारकाजवळील चिऊ पार्कला आमदार राजू पाटील यांनी भेट दिली. चिमण्या व इतर दुर्मिळ होत चाललेल्या पक्ष्यांच्या रक्षणासाठी असलेल्या चिऊ पार्कसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन ह्या वेळी आमदार राजू पाटील यावेळी पाटील यांनी दिले.यावेळी मनसे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहरअध्यक्ष राजेश कदम उपस्थित होते.

Post a Comment