भावी शैक्षणिक वाटचाल आव्हानात्मक असेल : सुरेंद्र दिघे
■रमाकांत कोळी प्रियांका लिमयेचा सत्कार करताना सोबत प्रकाश ठाणेकर ,सुरेंद्र दिघे ,हरेश्वर मोरेकर व चार्वी बागडी...
ठाणे , प्रतिनिधी : 1984 पासूनच्या मळलेल्या शैक्षणिक वाटा येत्या तीन वर्षांत मोडीत काढण्याच्या महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय शिक्षण विभागाने घेतला आहे . तुमच्या पुस्तकी ज्ञानाला आत्ता महत्व देण्यांत येणार नाही. प्रत्यक्ष अनुभवातून संपादन केले ज्ञानच बाजी मारणार आहे. या संक्रमणात मैदानावरचा विध्यार्थी हार - जीत कशी पचनी पाडायची हे खेळाच्या माध्यमातूम शिकलेला असतो. गेल्या पाच पिढया सामाजिक व क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य असलेली श्री आनंद भारती समाज संस्थेसारखी चिरंजीवी शतायुषी संस्था या तरुणांसाठी आधारवड ठरणार आहे.
मुलांनों ,तुमची भावी शैक्षणिक वाटचाल खूप आव्हानात्मक असणार आहे , अशा आशयाचे मार्गदर्शनपर मनोगत "ठाणे भूषण " व जिज्ञासा ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त सुरेंद्र शांताराम दिघे यांनी व्यक्त केले.श्री आनंद भारती समाज , ठाणे या संस्थेतर्फे शनिवारी सायंकाळी 119 व्या चंपाषष्टी उत्सवास प्रारंभ झाला. त्या निमित्ताने 69 व्या नाखवा स्मारक वार्षिक शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभाचे नेटके आयोजन करण्यांत आले. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुरेंद्र दिघे बोलत होते.
यंदाच्या दहावी शालांत परीक्षेत ठाणे केंद्रातून 22 हजार 256 उमेदवारांत 99. 60 % गुण संपादून सर्वप्रथम आल्याबद्दल प्रियांका सुयश लिमयेचा 69 वे यशवंतराव ल. नाखवा तर याच [परीक्षेत 95.20 % गुण संपादन करून संस्थेत सर्वप्रथम आल्याबद्दल चार्वी सदानंद बागडी हिचा 68 वे दगडू पांडू नाखवा स्मारक पारितोषिक देऊन सत्कार कारण्यांत आला . सोबत 60 उत्तीर्ण विधार्थांचाही भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला .
या प्रसंगी अध्यक्ष रमाकांत कोळी ,उपाध्यक्ष प्रकाश ठाणेकर व कार्याध्यक्ष हरेश्वर मोरेकर व्यासपीठावर उपस्थित होते. सहकार्यवाहक सौ. माधुरी कोळी यांनी सूत्रसंचालन केले.कार्यवाहक संदीप कोळी यांनी अहवाल वाचन केले. सुयश कोळी व ओंकार वैती यांनी परिचय करून दिला. सौ. सुमिता दिघे उपस्थित होत्या.

Post a Comment