Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ५५ हजार पार


■११३ नवे रुग्ण तर २ मृत्यू ५,०९० एकूण रुग्ण तर १०७३ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत १८९ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येने ५५ हजारांचा आकडा ओलांडला असून आज नव्या ११३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १८९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    

 

आजच्या या ११३ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५५,०९० झाली आहे. यामध्ये १४१० रुग्ण उपचार घेत असून ५२,६०७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ११३ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- २०कल्याण प – २६डोंबिवली पूर्व ४०डोंबिवली प – ,  तर मोहना  येथील ६ रूग्णांचा समावेश आहे. 

 

        डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १३ रुग्ण टाटा आमंत्रामधून, १५ रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ५ रुग्ण पाटीदार कोविड सेंटर मधून,  ८ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ५५ हजार पार कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ५५ हजार पार Reviewed by News1 Marathi on December 08, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद प्रकाश आंबेडकर

◆ किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, मुंबईत मात्र हजारो कार्यकर्त्यांची धरपकड, आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे दाखवून दिले....

Post AD

home ads