Header AD

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांना कृत्रिम अवयव साहित्य वाटपकल्याण , कुणाल  म्हात्रे  :  जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधत जनसेवा संघटना आणि दिव्यांग विकास महासंघातर्फे दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव साहित्य वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना सर्वतोपरी मदतीसाठी जनसेवा संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेने दिव्यांग विकास महासंघाच्या माध्यमातून ६० दिव्यांग बांधवांना जयपूर फूटसह विविध कृत्रिम अवयवांचे यावेळी मोफत वाटप केले. यावेळी वाटप करण्यात आलेल्या दिव्यांग बांधवांच्या कृत्रिम अवयवांचे गेल्या आठवड्यात मोजमाप घेण्यात आले होते. 


कल्याण परिमंडळचे डीसीपी विवेक पानसरे, वरिष्ठ पत्रकार मंदार फणसे, जनसेवा संघटनेचे प्रमूख महेश तपासे, दिव्यांग विकास महासंघाचे अशोक भोईर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हे कृत्रिम अवयव वाटप करण्यात आले. समाजातील उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांसाठी काही तरी मदत करण्याच्या उद्देशाने आपण हा कार्यक्रम आयोजित केल्याचे आयोजक महेश तपासे यांनी सांगितले.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांना कृत्रिम अवयव साहित्य वाटप जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांना कृत्रिम अवयव साहित्य वाटप Reviewed by News1 Marathi on December 04, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या ध्येयपूर्ती पुस्तकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   दिलीप  गुंड यांचे "ध्येयपूर्ती" हे पुस्तक ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला आशादायी व प्रेरणादायी असे...

Post AD

home ads