Header AD

रामदास आठवले यांच्या वाढदिवसा निमित्त रुग्णांना फळवाटप

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन पार्टी युवक आघाडी, विद्यार्थी परिषद आणि सम्राट अशोक तरुण मंडळातर्फे कल्याण मधील रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले.


       रामदास आठवले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक कार्य व्हावे  आणि रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी या उद्देशाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी रुग्णांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा देत रामदास आठवले यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. तसेच मनुस्मृती दहन दिवसाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात मनुस्मृती दहन करण्यात आली.


यावेळी रिपाई जेष्ठ नेते अण्णा रोकडे, राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे, माजी नगरसेवक भीमराव डोळस, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संग्राम मोरे, शहर अध्यक्ष संतोष जाधव, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदचे प्रतिक सानप, कुमार कांबळे, विलास गायकवाड, जालिंदर बर्वे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.        

रामदास आठवले यांच्या वाढदिवसा निमित्त रुग्णांना फळवाटप रामदास आठवले यांच्या वाढदिवसा निमित्त रुग्णांना फळवाटप  Reviewed by News1 Marathi on December 25, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads