Header AD

फिनइनद्वारे निओबँकिंग प्लॅटफॉर्मची सुरुवात


बचत व गुंतवणूक करण्यासाठीचे हायपर पर्सनलाइज्ड समाधान...


मुंबई, २ डिसेंबर २०२० : बँकिंगच्या अनुभवाला आणखी नवा दृष्टीकोन देत फिनईन या भारतातील पहिल्या निओबँकेने देशभरात सुरुवात झाली आहे. ग्राहकाभिमुख व बचतीस प्राधान्य देणारी निओबँक फिनईनने आणली असून सध्याच्या फिनटेक क्षेत्रातील वेल्थ मॅनेजमेंट अॅपमधील विविध संकल्पनांशी ती जुळलेली असेल. फिनईनने ग्राहकांना २ मिनिटात सेव्हिंग अकाउंट आणि स्मार्ट कार्ड मॅनेजमेंट फिचर्ससह व्हिसा पॉवर्ड डेबिट कार्ड देण्याकरिता एसबीएम इंडियासोबत बँकिंग पार्टनर म्हणून भागीदारी केली आहे. २०१९ मध्ये सुमन गंधम आणि सुधीर मराम यांनी या बंगळुरूतील हे स्टार्टअप सुरु केले. पारदर्शक, आनंददायी व अडथळा विरहित निओबँकिंगचा अनुभव देण्याचा उद्देश यामागे आहे.


फिनईनचे माजी फिनटेक व्हीसी आणि संस्थापक, सीईओ, सुमन गंधम म्हणाले, “वास्तविक पाहता, भारत हा बँकिंग प्रक्रियेखाली नाही. बँकिंग क्षेत्रावर मोठा ताण आहे. यातील पायाभूत आराखड्यात हायपर-पर्सनलाइझेशनची कमतरता आहे. तंत्रज्ञानाचा वापर करत आमच्यासारखे पर्सनलाइज्ड निओबँकिंग प्लॅटफॉर्म यूझर्सना त्यांच्या पैशांसोबत अधिक चांगले नाते विकसित करण्यास मदत करते. यासाठी जुन्या बँकिंगच्या सेवा अधिक सुलभ केल्या जातात. फिनईन या वन-स्टॉप बँकिंग सोल्यूशनद्वारे यूझरला एकाच ठिकाणाहून त्याचे सर्व बँकेचे खाते व्यवस्थापित करता येतात. यामुळे अखंडपणे बँकिंगचा अनुभव घेत सर्व व्यवहारांचा मागोवा घेता येतो. ग्राहकांच्या बचत व खर्च करण्याची वर्तणूकीवर दृष्टीक्षेप टाकणारे अहवाल तयार करण्यासाठी अॅप एआयचा वापर करते.”


सध्या बँकिंग क्षेत्रात हायपर-पर्सनलायझेशन नसते तसेच ग्राहकांचा डेटा कमी वापरला जातो. बँकेच्या बहुतांश ग्राहकांना बचत आणि गुंतवणुकीची संकल्पना समजणे कठीण असते. फिनईन एआयच्या माध्यमातून ही समस्या सोडवते. ग्राहकांना त्यांचे बचत-खर्चाचे चक्र अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी तसेच दैनंदिन निर्णय घेण्यासाठी त्यांना अधिक माहिती मिळवण्यास त्यांना सक्षम करते.

फिनइनद्वारे निओबँकिंग प्लॅटफॉर्मची सुरुवात फिनइनद्वारे निओबँकिंग प्लॅटफॉर्मची सुरुवात Reviewed by News1 Marathi on December 02, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नालेसफाईच्या कामांवर अतिरिक्त आयुक्तांचा अंकुश ठेवावा-शानू पठाण विपक्ष नेत्यांच्या दौर्‍यानंतर प्रशासन लागले कामाला

ठाणे (प्रतिनिधी) -   मे महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्यानंतरही नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच आपण नालेसफाई पाहणीचा दौरा केला. य...

Post AD

home ads