भिवंडीत मालमत्ता कर खाजगीकरणा विरोधात राष्ट्रवादी महिलांचे उपोषण सुरू
भिवंडी , प्रतिनिधी : १६ डिसेंबर रोजी झालेली भिवंडी महानगरपालिकेच्या ऑनलाईन महासभेत मालमत्ता कर वसुली खाजगीकरण हा आयत्या वेळचा विषय चर्चेला घेऊन त्यास मंजुरी देण्यात आली .त्यानंतर शहरात राजकीय चर्चां सोबत आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून हा मंजूर विषय तात्काळ रद्द करावा यामागणी करीता राष्ट्रवादी काँग्रेस मागील आघाडीच्या शहराध्यक्षा स्वाती कांबळे, जावेद फारुखी यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका मुख्यालय इमारती समोर महिला कार्यकर्त्यांसह आमरण उपोषण सुरू केले आहे .
सोमवारी सकाळी आंदोलन सुरू करण्या आधी आयुक्त डॉ.पंकज आशिया यांच्या दालना बाहेर ठिय्या आंदोलन करून त्यांच्याकडे ठराव रद्द करण्याची मागणी केली तर महापौर जो पर्यंत हा ठराव रद्द करणार नाहीत व तसे लेखी आश्वासन देत नाहीत तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असून भिवंडी शहरात वीज बिल वसुलीच्या खाजगिकरणा मुळे शहरातील नागरिक टोरेंट पॉवर कंपनीच्या दादागिरी मुळे मेताकुटीला आले असताना
भिवंडी शहर हे गरीब कामगारांचे शहर आहे ,येथे रोज कमावून खाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने या नव्या ठराव मुळे खाजगी ठेकेदाराच्या नव्या दादागिरीला नागरीकांना सामोरे जावे लागणार असल्याने नागरिक नागविले जातील असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी शहराध्यक्ष स्वाती कांबळे यांनी केला आहे .
भिवंडीत मालमत्ता कर खाजगीकरणा विरोधात राष्ट्रवादी महिलांचे उपोषण सुरू
Reviewed by News1 Marathi
on
December 28, 2020
Rating:

Post a Comment