Header AD

भिवंडी मालमत्ताकर खासगीकरण मुद्दा रंगू लागला काँग्रेस नगरसेवकांचे मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन

 




भिवंडी , प्रतिनिधी  :  भिवंडी महानगरपालिकेच्या तहकूब महासभेत शहरातील घरपट्टी व पाणीपट्टी वसुली अत्यल्प होत असल्याने शिवसेना नगरसेवक मनोज काटेकर यांनी  मालमत्ता कर वसुली खाजगीकरण करण्या बाबतची मागणी करणारे पत्र महासभेत महापौरां कडे दिल्या नंतर महासभेत आयत्या वेळचा विषय म्हणून खाजगीकरणा चा मुद्दा मंजूर करीत महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी प्रशासनाने प्रस्ताव बनविण्या बाबत आदेश दिले .त्यानंतर शहरात राजकीय चर्चांना उत आला असून या निर्णयाच्या समर्थन व विरोधात नगरसेवक उभे राहिले असता काँग्रेस नगरसेवकांनी माजी शहराध्यक्ष शोएब खान गुड्डू यांच्या नेतृत्वाखाली या निर्णयाच्या विरोधात आयुक्त डॉ पंकज आशिया यांच्या कार्यालयात धरणे आंदोलन करीत मालमत्ता कर खाजगीकरण निर्णय रद्द करावा अशी मागणी केली .


          खाजगीकरणाच्या विषयास शहरातील राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांनी विरोध करण्यास सुरुवात केली असून  मंगळवारी सायंकाळी भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेसच्या सुमारे 20 नगरसेवकांनी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शोएब गुड्डू यांच्या नेतृत्वा खाली महापालिकेतील आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करीत हा ठराव रद्द करण्याची मागणी केली. यावेळी मनपा युक्त डॉ पंकज आशिया यांची आंदोलनकर्त्यांनी भेट घेऊन आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन देखील मनपा आयुक्तांकडे दिले. या आंदोलनाप्रसंगी काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत लाड , प्रदीप राका, वसीम अन्सारी , फराज बाबा , जाकीर मिर्जा , सिद्धेश्वर कामूर्ती , जुबेर अंसारी , आरिफ खान , आबू सुफियान , अरुण राऊत , नासिर खान , मोहम्मद हुसेन , साद मोमीन, इरफान वायरमन , साजिद खान , राहुल पाटील ,मुजाहिद अंसारी , साजिद अंसारी , अश्रफ मुन्ना आदी काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते.
          

दरम्यान आंदोलनादरम्यान आपण मनपा आयुक्तांची भेट घेतली असता सदरचा ठराव अजून माझ्या पर्यंत मंजुरीसाठी आलेला नाही , सदर ठराव माझ्याकडे आल्यानंतर त्यातील कायदेशीर बाबी तपासल्या जातील जर हा ठराव बेकायदेशीर असेल तर त्यास आपण मंजुरी देणार नाहीत असे आश्वासन आम्हाला मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी दिले असून जो पर्यंत हा ठराव मागे घेत नाहीत तोपर्यंत आपण आंदोलन करू अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी अध्यक्ष शोएब गुड्डू यांनी दिली आहे.

भिवंडी मालमत्ताकर खासगीकरण मुद्दा रंगू लागला काँग्रेस नगरसेवकांचे मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन भिवंडी मालमत्ताकर खासगीकरण मुद्दा रंगू लागला  काँग्रेस नगरसेवकांचे मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन Reviewed by News1 Marathi on December 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads