Header AD

पालिका स्थापनेपासून दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत एकही रुपया खर्च नाही

 

■वंचित बहुजन आघाडीच्या धरणे आंदोलनात सत्ताधारी आणि प्रशासनावर आरोप...


डोंबिवली , शंकर जाधव  : स्थानिक स्वराज्य संस्थेत दरवर्षी एकूण अर्थसंकल्पाच्या १० टक्के निधी हा दलित वस्ती सुधार योजनेसाठी राखीव ठेवावा लागतो. मात्र कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत एकही रुपया खर्च नाही झाला नाही असा जाहीर आरोप वंचित बहुजन आघाडीने डोंबिवलीत केला. सोमवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना सत्ताधारी आणि प्रशासनावर आरोप जोरदार टीका केली.


या आंदोलनात कल्याण-डोंबिवली जिल्हा संघटक मिलिंद साळवे,डोंबिवली अध्यक्ष सुरेंद्र ठोके उपाध्यक्ष राजू काकडे,जिल्हा सचिव रेखा कुरवारे,जिल्हा उपाध्यक्ष अॅड रजनी आगळे,महासचिव बाजीराव माने,संघटक अशोक गायकवाड,सचिव नंदू पाईकराव,सदस्य प्रभाकर मोरे,रोहित इंगळे,आकाश भास्कर,शांताराम तेलंग,संघटक अर्जुन केदार,शाखा अध्यक्ष संतोष खंदारे,वाॅड अध्यक्ष विलास मोरे आदीसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.डोंबिवलीतील झोपडपट्टी वासियांना नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते.आंदोलनकर्त्यांनी डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरुवात केली.


इंदिरा चौकात आंदोलकर्त्यांनी मोर्चा काढत पालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलनात सत्ताधारी आणि प्रशासनावर टीका करताना कल्याण-डोंबिवली जिल्हा संघटक मिलिंद साळवे म्हणाले,खासदार आणि आमदार हे मताच्या जोगवा मागण्यासाठी झोपडपट्टीत येतात.मात्र निवडणुका झाल्यावर झोपडपट्टीच्या विकासाकडे कानाडोळा करतात. झोपडपट्टीचा विकास होण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आग्रह केला नाही तर हे आंदोलन अधिकच तीव्र करू असे सांगितले.दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून पालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी आंदोलन करत असल्याचे पाहून वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निंबाळकर यांची भेट घेतली. आपल्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचे निंबाळकर यांना सांगितले.

पालिका स्थापनेपासून दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत एकही रुपया खर्च नाही पालिका स्थापनेपासून दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत एकही रुपया खर्च नाही Reviewed by News1 Marathi on December 28, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads