Header AD

मुलीच्या संगोपनासाठी पत्नीकडूनच पैश्याची मागणी करणाऱ्या पती विरोधात गुन्हा दाखल

भिवंडी , प्रतिनिधी  :  महिला अन्याय अत्याचाराच्या व घरेलू हिंसाचाराच्या अनेक घटना समोर येत असतांनाच मुलगी झाली म्हणून पतीने पत्नीकडून मुलीच्या संगोपनासाठी ३० हजार रुपयांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.  खळबळजनक बाब सदर रक्कम पत्नी देऊ न शकल्याने पतीने पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ सुरु केला. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात  पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलशाद गामा मोमीन, असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. तर दीर सोनू आणि नौशाद (रा . शांतीनगर, भिवंडी ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. 

पीडित पत्नीने मुलीला जन्म देतातच  छळ सुरू ...

पीडिताचे काही वर्षांपूर्वीच आरोपी दिलशान याच्याशी मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे निकाह झाला होता. त्यांनतर मार्च महिन्यात पीडित पत्नीला मुलगी झाली होती. त्यामुळे आरोपी पती याने  २० मार्च ते १८ मे २०२० या दोन महिन्यांच्या काळात  पत्नीला मुलगी झाली म्हणून मुलीच्या संगोपनासाठी ३० हजार रुपये मागणीचा  तगादा लावला होता . मात्र माहेरची आर्थिक परिस्थिती नसल्याने ३० हजार रुपये देण्यास पीडित पत्नी असमर्थ ठरली होती. त्यामुळे तिचा पती सह दोन दिरांनी आपसात संगनमत करून  पीडित  पत्नीचा छळ सुरु केला होता अखेर या छळाला कंटाळून विवाहितेने पतीसह दिरांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास शांतीनगर पोलीस करीत आहेत. 


  'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियान प्रभावीपणे राबविण्याची गरज .

एकीकडे समाजातील आजही काही कुटुंबात  वंशाला दिवा म्हणून मुलगाच  झाला पाहिजे अशी मानसिकता असल्याचे अनेक घटनांवरून समोर आले आहे. तर दुसरीकडे 'बेटी बचाओ, बेटी पढाओ ' हा केंद्र सरकारने नारा देत, यासाठी समाजात विविध कार्यक्रमाअंर्तगत जनजागृती राबवित आहे. मात्र आजही समाजातील काही लालची आणि निर्दयी कुटूंब मुलाच्या हवशापोटी मुलीचा छळ करून तिला जन्म देणाऱ्या मातेचाही मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'ची केवळ घोषणा न करता  समाजात मुलीचा  छळ  करणाऱ्या  अश्या कुटूंबापर्यत जनजागृती प्रभावीपणे  राबविण्याची आवश्यता  असल्याचे  या घटनेवरून दिसून आले आहे.
मुलीच्या संगोपनासाठी पत्नीकडूनच पैश्याची मागणी करणाऱ्या पती विरोधात गुन्हा दाखल मुलीच्या संगोपनासाठी  पत्नीकडूनच पैश्याची मागणी करणाऱ्या पती विरोधात गुन्हा दाखल Reviewed by News1 Marathi on December 06, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या ध्येयपूर्ती पुस्तकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   दिलीप  गुंड यांचे "ध्येयपूर्ती" हे पुस्तक ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला आशादायी व प्रेरणादायी असे...

Post AD

home ads