अनधिकृत बांधकामा विरोधात काँग्रेस पुकारणार यलगार
ठाणे, प्रतिनिधी : ठाणे;ठाण्यातील अनधिकृत बांधकामाच्या वाढत्या तक्रारींची दखल घेउन काँग्रेसने या बाधकामा विरोधात व या बाधकामाना अभय देणा-या सर्वच घटकांविरोधात काॅग्रेस यवगार पुकारणार असून उद्यापासून याची सुरूवात होणार असल्याची माहिती शहर काँग्रेस अध्यक्ष अँड विक्रांत चव्हाण यांनी दिली.अनधिकृत बांधकामाच्या वाढत्या तक्रारींची दखल घेउन आज काँग्रेसने पत्रकार परिषदेत आपली आगामी भूमिका स्पष्ट केली शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण,प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे,शहर काँग्रेस सरचिटणीस व प्रवक्ते सचिन शिंदे,प्रवक्ता गिरीष कोळी व सरचिटणीस विजय बनसोडे यांच्या उपस्थितीत केली.
या प्रसंगी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की खरेतर नवीन आयुक्तांकडून आम्हाला खूप अपेक्षा होत्या परंतु काही अधिकारी व बाधकाम माफीयाच्या संगमताने हि बाधकामे सुरूच असून अनधिकृत बांधकाम व फेरिवाल्याकडून काही अधिकारीना 3 करोड रूपयाचा हप्त्या पोहचत असल्याचा आरोप विक्रांत चव्हाण यांनी केला याची सी.आय्.डी.चौकशीची मागणीही केली असल्याचे त्यांनी सांगितले.या अनधिकृत बांधकाम करणारे व त्यांना पाठीशी घालणारे यांचे एक रॅकेट असून आता काँग्रेसचै पदाधिकारी ठीक ठीकाणी प्रभाग समिती कार्यालयासमोर आंदोलन करून विरोध करेल यांची सुरूवात उद्यापासूनच करण्यात येणार असून दिवा प्रभाग समिती कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
क्लष्टर बाबतही कोणतीही सूसूत्रता अजूनही येत नसून यामध्ये पारदर्शकता येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.क्लष्टरला आमचा विरोध नसून सर्वाना विश्वासात घेउन हि योजना राबवावी असे त्यांनी शेवटी सांगितले.याप्रसंगी बोलताना प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे यांनी सांगितले ठाणे शहरातील वाढते अनधिकृत बांधकामाना महानगरपालिका अधिकारी जबाबदार असून त्यांच्या कृपाशिर्वादानेच हि बांधकाम होत असल्याचे सांगितले.अधिकारी कडून आयुक्तांना याबाबत पूर्ण माहिती दिली जात नसल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.क्लष्टरबाबत आजही नागरिकांमध्ये संभ्रम असून हा संभ्रम दूर होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment