Header AD

ओपन लँन्ड थकबाकी करापोटी ५ कोटी ४७ लाखांचा पालिका तिजोरीत भरणा

                     



कल्याण, कुणाल म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली मनपाने मालमत्ता कर थकबाकी दारांसाठी अभय योजना सुरु केली असुन सोमवारी एका विकासकाने तब्बल ५ कोटी ४७ लाखांचा भरणा केल्याने मनपाच्या तिजोरीत भर पडली आहे.


मनपाच्या ब प्रभाग हद्दीतील मौजे बारावे येथील गोदरेज पार्कशेजारील मोकळ्या जमिनीवरील कर सन १४-१५ पासून थकीत होतात्यामुळे त्यास बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र ही देण्यात आलेले नाही. महापालिकेने केलेल्या आवाहनाच्या अनुषंगाने, १५ ऑक्टोबर २०२० पासून जाहीर केलेल्या अभय योजनेअंतर्गत या ओपन लॅण्डच्या थकीत करापोटी (रु९कोटी ७०लक्ष) पैकी रु. ५ कोटी ४७ लाख रकमेचा भरणा सदर ओपन लॅण्डचे सब डेव्हलपर जोहर झोझवाला यांनी महापालिकेत केल्याने असल्याने मनपा तिजोरीत भर पडली आहे.


यानिमित्ताने  इतर विकासकांनीही आपल्या ओपन लॅण्डचा थकीत कर अभय योजनेअंतर्गत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत भरून या योजनेचा लाभ घ्यावा आणि महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.


ओपन लँन्ड थकबाकी करापोटी ५ कोटी ४७ लाखांचा पालिका तिजोरीत भरणा ओपन लँन्ड थकबाकी करापोटी ५ कोटी ४७ लाखांचा पालिका तिजोरीत भरणा   Reviewed by News1 Marathi on December 01, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads