Header AD

जयेश जाधव यांची राष्ट्रवादी ठाणे शहर संघटक पदी निवड





कळवा , प्रतिनिधी  :   महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार व ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली एन के टी हॉल ठाणे येथे दिनांक 26 डिसेंबर रोजी युवा संकल्प मेळावा चे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक मेहबूब शेख प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपस्थित होते मंचावर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विक्रम खामकर युवक रोजगार सेलचे अध्यक्ष ओमकार माळी नगरसेवक जितेंद्र पाटील नगरसेवक शानु पठाण महिला कार्याध्यक्ष सुरेखा पाटील परिवहन सदस्य मोहसीन खान विधानसभा कार्याध्यक्ष संतोष मोरे युवक कार्याध्यक्ष दिनेश बने उपस्थित होते.



यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना शेख म्हणाले की आपण स्वतः अल्पसंख्याक समाजातील आहे पण जबाबदारीने बोलत आहे की देशात भाजपाने हिंदू मुस्लिम धर्मीयांमध्ये फूट पाडण्याचे काम सुरू केले आहे त्यासाठी त्यांनी एम एम आय च ओवेसी यांचा वापर सुरू केला आहे यावरून भाजप व एम आय एम यांची मिलीभगत असल्याचे स्पष्ट होत आहे त्यामुळे देशात सध्या फक्त शरद पवार हेच  एकमेव  टक्कर देणारे नेते आहेत त्यांचे नाव युपीएचा अध्यक्षपदासाठी चर्चेला आले आहे त्यामुळे आता युवक म्हणून आपली जबाबदारी वाढली आहे येणाऱ्या तीन महिन्यांमध्ये युवकांनी घोड्यासारखे काम करून बुध बांधणी करायची आहे तसेच डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनीसुद्धा युवकांना मार्गदर्शन केले सध्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्रम खामकर हे चांगले काम करत आहे पण आपणाला केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात जनजागृती करण्यासाठी आंदोलन करावे लागणार आहे .


आपले सरकार असताना आपण क्लस्टरसाठी उपोषण केले होते मोर्चा काढला होता त्यामुळे जनतेचे हिताचे प्रश्न घेऊन लढले पाहिजे असे आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी युवकांना केले या युवा संकल्प मेळाव्यामध्ये पदी नियुक्ती करण्यात आली त्यामध्ये जयेश जाधव यांची ठाणे शहर संघटक पदी निवड करण्यात आली तसेच संतोष जाधव विधानसभा अध्यक्ष राहुल महेंद्र कळवा ब्लॉक उपाध्यक्ष नयन पाटील युवक अध्यक्ष जीवन शेंडगे युवक वार्ड अध्यक्ष यांची निवड करण्यात आली त्याप्रसंगी ठाणे शहर सचिव विजय पवार प्रभाग अध्यक्ष समाधान माने वार्ड अध्यक्ष जितेंद्र गवते निखिल तांबे रामदास यादव महेश राऊत नवनाथ कोळी हरेश बॉस भोस्टकर. भावेश जाधव रोहित चाळके तुषार माने अक्षय पाटील विशाल बुरा सहयोग गवते मोठ्या संख्येने उपस्थित होते
जयेश जाधव यांची राष्ट्रवादी ठाणे शहर संघटक पदी निवड  जयेश जाधव यांची राष्ट्रवादी ठाणे शहर संघटक पदी निवड Reviewed by News1 Marathi on December 27, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

विद्यार्थ्यां मुळे होऊ शकतात कमी अपघात ३२व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर परिवहन आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यक्त केले मत

ठाणे , प्रतिनिधी  :  पालक आपल्या मुलांच्या शब्दाबाहेर जात नाहीत हा अनुभव लक्षात घेता सुरक्षित रस्ता प्रवासाच्या जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ...

Post AD

home ads