Header AD

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने दुकानदारांना गुलाब पुष्प देत बंद मध्ये केले सहभागी





भिवंडी ,  प्रतिनिधी   :  केंद्र शासनाने पारित केलेल्या कृषी विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी मंगळवारी देशातील विविध शेतकरी संघटनांसह भाजप व मित्रपक्ष वगळता सर्वपक्षीय भारत बंद आंदोलन करण्यात आला. भिवंडीत राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दुकानदारांना चक्क गुलाब पुष्प देत आपली दुकाने बंद करून भारत बंद मध्ये सहभागी होण्याची विनंती केली . 


राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने दिलेल्या या सन्मानाने दुकानचालकांनी आपापली दुकाने बंद करून भारत बंदला समर्थन दर्शविले . शहरातील जकात नाका ते वंजारपट्टी नाका पर्यंत पायपीट करीत राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांनी दुकानदारांना गुलाब पुष्प देऊन बंद मध्ये सहभागी होण्याचे आव्हान केले . याप्रसंगी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जावेद फारुकी यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . यानंतर आपल्या विविध मागण्यांसह शेतकरी विरोधातील कृषी कायदा रद्द करण्यासंदर्भातील लेखी निवेदन देखील प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले . 
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने दुकानदारांना गुलाब पुष्प देत बंद मध्ये केले सहभागी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने दुकानदारांना गुलाब पुष्प देत बंद मध्ये केले सहभागी Reviewed by News1 Marathi on December 08, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

विद्यार्थ्यां मुळे होऊ शकतात कमी अपघात ३२व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर परिवहन आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यक्त केले मत

ठाणे , प्रतिनिधी  :  पालक आपल्या मुलांच्या शब्दाबाहेर जात नाहीत हा अनुभव लक्षात घेता सुरक्षित रस्ता प्रवासाच्या जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ...

Post AD

home ads