Header AD

शेजाऱ्यांचे भांडण सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले कल्याणमध्ये
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  शेजाऱ्यांचे भांडण सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले कल्याणमध्ये आले होते. कल्याणमध्ये राहणारे आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दयाल बहादूरे यांचा शेजाऱ्यांशी वाद झाल्यानंतर खडकपाडा पोलिस ठाण्यात एकमेकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर केंद्रीय समाजकल्याण मंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवले कल्याणमध्ये दयाल बहादूरे यांच्या घरी पोहचले. बहादूरे यांच्या घरात अदालत लावली.


यावेळी आरपीआयचे पदाधिकारी आणि पोलिस आमने सामने होते. पोलिसांनी गुन्ह्याची पाश्र्वभूमी सांगत या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणी केंद्रीय मंत्री आठवले यांचे म्हणणे आहे कीदयाल बहादूरे यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात देण्यात आलेली तक्रार ही पोलिसांवर दबाव टाकून देण्यात आली आहे.  आपण एका इमारतीत राहतो. त्यामुळे एकमेकांच्या विरोधात टॉन्टींग न करता. एकमेकांना संभाळून घेतले पाहिजे. या प्रकरणात पोलिसानी उचीत कारवाई करण्याचे निर्देश रामदास आठवले यांनी पोलिसांना दिले.

शेजाऱ्यांचे भांडण सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले कल्याणमध्ये शेजाऱ्यांचे भांडण सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले कल्याणमध्ये Reviewed by News1 Marathi on December 31, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads