भिवंडीत 'बाईकर्स' अड्ड्याला भीषण आग आगीत अड्डा जळून खाक
भिवंडी , प्रतिनिधी : आगीचे सत्र सुरूच असून कालच चावींद्रा गावातील एका पेट्रोल पंपावर सीएनजी गॅस भरताना ओमनी गाडीमध्ये आग लागून जळून खाक झाली होती. आता त्यापाठोपाठ मध्यरात्रीच्या सुमाराला कोनगावातील एका बाईकर्स अड्ड्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या भीषण आगीत संपूर्ण बाईकर्स अड्डा जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.
जीवितहानी नाही; आग शॉटसर्किट मुळे लागल्याचा अंदाज...
भिवंडी - कल्याण रोडवरील कोनगाव हद्दीत 'बाईकर्स अड्डा' या नावाने मोहंमद अस्लम यांचे दुचाकीचे सर्व्हिस सेंटर आहे. या सर्व्हिस सेंटर सर्वच महागड्या दुचाक्यांची दुरुस्ती केली जाते. मात्र या सर्व्हिस सेंटरला मध्यरात्रीच्या सुमाराला अचानक आग लागली होती. आग लागली त्यावेळी सुदैवाने सर्व्हिस सेंटरमध्ये कोणीही नव्हते. त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाची १ गाडी व पाण्याचा टँकर घटनास्थळी दाखल होऊन तासाभरात आगीवर नियंत्रण मिळाले. मात्र तोपर्यत सेंटर मधील दुचाकी दुरुस्ती करण्याचे विविध मशीन व साहित्य जळून खाक झाले. हि आग शॉटसर्किट मुळे लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केला असून या आगीच्या घटेनची नोंद कोनगाव पोलीस ठाण्यात करण्यात येऊन पुढील तपास सुरु केला आहे.
भिवंडीत 'बाईकर्स' अड्ड्याला भीषण आग आगीत अड्डा जळून खाक
Reviewed by News1 Marathi
on
December 03, 2020
Rating:

Post a Comment