Header AD

नेफ्रोप्‍लसने प्राप्त केला १०० दशलक्ष डॉलर्सहून अधिक किंमतीचा उझबेकिस्तान डायलिसिस करार
मुंबई, २१ डिसेंबर २०२०  :  नेफ्रोप्‍लस या आशियाच्‍या अग्रणी डायलिसिस नेटवर्कने कॉमनवेल्‍थ ऑफ इंडिपेंडण्‍ट स्‍टेस्‍ट्स (सीआयएस) बाजारपेठेमध्‍ये आपली उपस्थिती वाढवत आपल्या शिरपेचात आणखी एका तु-याची भर केली आहे. कंपनीने स्‍पर्धात्‍मक आंतरराष्‍ट्रीय लिलाव प्रक्रियेमध्‍ये उझबेकिस्‍तान प्रजासत्ताकसाठी व्‍यापक डायलिसिस प्रोग्राम निर्माण करण्‍याचा व त्‍याचे कार्यसंचालन पाहण्‍याचा करार संपादित केला. या १० वर्षे मुदत असलेल्‍या प्रकल्‍पासंदर्भात उझबेकिस्‍तान प्रजासत्ताक आरोग्‍य मंत्रालय व नेफ्रोप्‍लस करारबद्ध होणार आहेत. हा उच्‍च मूल्‍यात्मक प्रकल्‍प नेफ्रोप्‍लससाठी प्रकल्‍प मुदतीदरम्‍यान ७५० ते ८०० कोटी रूपयांहून अधिक महसूल निर्माण करण्‍याची अपेक्षा आहे.


उझबेकिस्‍तान सरकारने नेफ्रोप्‍लसला १,१०० हून रूग्‍णांना दर्जात्‍मक डायलिसिस सेवा देण्‍याच्‍या मनसुब्‍यासह ताशकेंत, कराकलपाकस्‍तान व खोरेझम प्रांतामधील चार मोठ्या डायलिसिस केंद्रांना अर्थसाह्य, रचना, सुसज्‍ज करण्‍याचा, कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्‍याचा आणि त्‍यांचे कार्यसंचालन पाहण्‍याचा अधिकार दिला. वर्षानुवर्षे डायलिसिक केअरसंदर्भातील गरज वाढत असल्‍यामुळे सरकारला या उपक्रमामध्‍ये आणखी ३०० हून अधिक रूग्‍णांची भर करण्‍याचा देखील अधिकार आहे. या प्रकल्‍पासाठी नेफ्रोप्‍लस १०० टक्‍के मालकीची स्‍थानिक उपकंपनी स्‍थापित करेल आणि भारतातील प्रमुख संसाधने देशामधील डायलिसिस केअरचा दर्जा सुधारण्‍यासाठी आंतरराष्‍ट्रीय मानक वैद्यकीय नियमांची अंमलबजावणी करतील व देखरेख पाहतील.


या कराराचा भाग म्‍हणून नेफ्रोप्‍लस राजधानी शहर ताशकेंतमध्‍ये ७५० हून अधिक रूग्‍णांना सेवा देण्‍यासाठी आशियामधील सर्वात मोठे डायलिसिस केंद्र उभारणार आहे. ताशकेंतमधील हे नवीन केंद्र आशियामधील सध्‍याच्‍या सर्वात मोठ्या केंद्राशी पूरक असेल. हे केंद्र भारतातील तिरूपती येथील एसव्‍हीआयएमएस युनिव्‍हर्सिटी येथे असून नेफ्रोप्‍लसद्वारे कार्यसंचालित आहे. या प्रकल्‍पाचा ग्रामीण रूग्‍णांना देखील लक्षणीय फायदा होईल. नेफ्रोप्‍लस देशात पहिलाच होम डायलिसिस उपक्रम सादर करणार आहे. हा होम डायलिसिस उपक्रम ग्रामीण रूग्‍णांसाठी प्रवास वेळ आणि संबंधित खर्च कमी करत जीवनाचा दर्जा सुधारेल.


हा करार जिंकल्‍याबाबत नेफ्रोप्‍लसचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. विक्रम वुप्‍पाला म्‍हणाले, ''आम्‍हाला उझबेकिस्‍तानमध्‍ये उच्‍च दर्जाची व रूग्‍णकेंद्रित डायलिसिस केअर सेवा देण्‍यासाठी उझबेकिस्‍तान सरकारसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. नेफ्रोप्‍लस टीमने जगातील विविध सर्वात मोठ्या डायलिसिस नेटवर्क्‍सशी स्‍पर्धा करण्‍यामध्‍ये आणि आमचे प्रबळ तंत्रज्ञान कौशल्‍य व कार्यक्षम कार्यरत मॉडेलच्‍या आधारावर हा करार जिंकण्‍यामध्‍ये अद्वितीय कामगिरी बजावली आहे. 


कोविड महामारीमुळे ही प्रक्रिया आव्‍हानात्‍मक होती, पण टीमने चिकाटी दाखवत अशा प्रकारच्‍या सर्व आव्‍हानांवर मात केली. नेफ्रोप्‍लस ही आशियामधून एकमेव बोलीदाता कंपनी होती, जे आमच्‍यासाठी अत्‍यंत अभिमानास्‍पद आहे. या निष्‍पत्तीमधून सिद्ध होते की, भारतीय आरोग्‍यसेवा कंपन्‍या अत्‍यंत मोठ्या जागतिक कंपन्‍यांसोबत स्‍पर्धा करू शकतात आणि विजयी ठरू शकतात. आम्‍ही भारतातील संपादित केलेल्‍या रूग्‍णकेंद्रित मॉडेलच्‍या माध्‍यमातून उझबेकिस्‍तानच्‍या डायलिसिस रूग्‍णांना सेवा देण्‍यास उत्‍सुक आहोत.'


अधिक माहितीसाठी https://www.nephroplus.com/ येथे भेट द्या.नेफ्रोप्‍लसने प्राप्त केला १०० दशलक्ष डॉलर्सहून अधिक किंमतीचा उझबेकिस्तान डायलिसिस करार नेफ्रोप्‍लसने प्राप्त केला १०० दशलक्ष डॉलर्सहून अधिक किंमतीचा उझबेकिस्तान डायलिसिस करार Reviewed by News1 Marathi on December 21, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads